madhuri elephant news : माधुरीला परत पाठवण्यावर तुर्त कोणताही निर्णय नाही

SHARE:

madhuri elephant news : माधुरीला परत पाठवण्यावर तुर्त कोणताही निर्णय नाही : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्ती प्रकरणी आज (दि.12) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, हत्तीणीला कोल्हापुरात परत पाठवण्यासंदर्भात तुर्त कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हे प्रकरण उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवण्यावर आज सर्वोच्च न्यायालयात एकमत झाले.

madhuri elephant news : माधुरीला परत पाठवण्यावर तुर्त कोणताही निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवण्यावर एकमत

सर्वोच्च न्यायालयात माधुरी उर्फ माधवी हत्ती प्रकरणी महत्त्वपूर्ण सुनावणी

राज्य सरकारच्या वकीलांनी आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना म्हटले आहे की, ’हा हत्ती कोल्हापूरवरून वनताराकडे पाठवला आहे. तो कोल्हापूरला परत पाठवावा, असा युक्तीवाद राज्य सरकारच्या वकीलांनी केला. यावर हत्तीची तब्बेत खूप खराब असल्याची कोर्टाने टिप्पणी करत आम्ही वनतारा बरोबर बोलू असे म्हटले. यानंतर हायपॉवर कमिटीकडे हे प्रकरण दिल्याचे राज्य सरकार वकीलांनी म्हटले. यावर कोर्टाने हायपॉवर कमिटी काय आहे, असा सवाल कोर्टाने विचारला.

हा हत्ती कोल्हापूर वरून वनताराकडे पाठवला आहे. लोकांच्या भावनावणी आहे की तो हत्त्ती परत कोल्हापूरला पाठवावा, तुम्ही कोर्टाच्या निर्णयापेक्षा लोकांच्या भावना पाहत आहात ? असा सवाल देखील कोर्टाने राज्य सरकारच्या वकीलांना सुनावणीवेळी केला आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात माधुरी हत्तीण परत पाठवण्याचा कुठलाही निर्णय झाला नाही. तसेच हे प्रकरण एका उच्चस्तरीय कमितिकडे पाठवलं जाईल, असे सगळ्या पक्षकारांचं आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी एकमत झाले.

काय आहे नेमकं ’माधुरी हत्ती प्रकरण’?

कोल्हापूरच्या नांदणी येथील जैन मठात 33 वर्षांपासून असलेली हत्तीण माधुरी उर्फ महादेवी याबाबतचा वाद माधुरी हत्ती प्रकरण म्हणून ओळखला जातो. मठ व नागरिकांचा धार्मिक भावनेतून तिला वनतारामधून कोल्हापूरला परत आणण्याचा आग्रह आहे. तर न्यायालय व प्राणीसंवर्धन संस्था हिच्या आरोग्य व कल्याणाला प्राधान्य देत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला जामनगरच्या वनतारा पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे धार्मिक भावना, जनआंदोलन आणि प्राणीसंवर्धन कायदे अशा तिघांच्या कचाट्यात हे प्रकरण अडकल्याने राज्यभर चर्चेत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *