दिनेशकुमार ऐतवडे
vantara park jamnagar : असे आहे जामनगरमधील वनतारा जगातील सर्वात मोठे प्राणी रेस्क्यू सेंटर बर्याच घडामोडीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठातील हत्ती जामनगर येथील वनतारा पार्कमध्ये पाठविण्यात आला आहे. परंतु अंबांनींच्या या वनतारा पार्कमध्ये आहे तरी काय याचाच घेतलेला हा आढावा ….
vantara park jamnagar : असे आहे जामनगरमधील वनतारा जगातील सर्वात मोठे प्राणी रेस्क्यू सेंटर
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनकडून ’वनतारा’ या नव्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देश आणि परदेशातील जखमी, शोषित प्राण्यांवर उपचार, देखभाल आणि पुनर्वसन करण्यात येणार आहे. भारतातील अशा प्रकारचा पहिलाच मोठा उपक्रम असून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स फाऊंडेशनचे संचालक अनंत अंबानी यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनने 26 फेब्रुवारी रोजी ’वनतारा’ हा कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा उद्देश देश आणि परदेशातील जखमी, शोषित प्राण्यांवर उपचार, देखभाल आणि त्यांचे पुनर्वसन करणे असा आहे.
अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच मोठा उपक्रम असून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स फाऊंडेशनचे संचालक अनंत अंबानी यांच्या देखरेखीखाली या उपक्रमाचे काम होणार आहे.
गुजरातमधील रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये ’वनतारा’ हे 3000 एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. प्राण्यांची काळजी आणि त्यांच्या कल्याणासाठी उत्कृष्ट तज्ञांसोबत काम करून 3 हजार एकर पसरलेल्या क्षेत्राला जंगलाप्रमाणे रूपांतरित करण्यात आले आहे.
जखमी प्राण्यांसाठी उत्तम आरोग्यसेवा, रुग्णालये आणि प्राण्यांवर आधारित शैक्षणिक आणि संशोधन केंद्र उभारण्याचे ’वनतारा’ चे लक्ष आहे. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाद्वारे 200 हून अधिक हत्ती आणि इतर लाखो सरपटणारे प्राणी तसेच पक्ष्यांची धोकादायक परिस्थितीतून सुटका करण्यात आली आहे. गेंडे, बिबट्या आणि मगरी यांसारख्या प्रमुख प्रजातींचे पुनर्वसन करण्यासाठीही यामाध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. याशिवाय वनताराने मेक्सिको, व्हेनेझुएला इत्यादी देशांतील बचाव मोहिमांमध्येही सहभाग घेतला आहे.
also read this
महादेवीच्या पावलांनी नांदणीची माती पुन्हा ओलावली
नांदणी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
हजारोंच्या उपस्थितीत नांदणीच्या महादेवी ह्रत्तीला निरोप
वनताराच्या स्थापनेमागील उद्दिष्ट स्पष्ट करताना अनंत अंबानी म्हणाले, वनतारा हे आधुनिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक व्यावसायिकतेसह करुणेच्या जुन्या नैतिक मूल्यांचे मिश्रण आहे. मी जीव सेवेला सर्वशक्तिमान आणि मानवतेची सेवा म्हणून पाहतो. वनतारामध्ये हत्तींसाठी विशेष केंद्र असून याशिवाय सिंह, वाघ, मगरी, बिबट्या आणि इतर लहान-मोठ्या प्रजातींसाठी सुविधा आहेत.
vantara-park-jamnagar-this-is-how-vantara-in-jamnagar-is-the-worlds-largest-animal-rescue-center
वनतारा येथील हत्तींचे केंद्र 3000 एकर परिसरात पसरलेले आहे. येथे हत्तींसाठी अत्याधुनिक निवारा, हायड्रोथेरपी पूल, जलाशय आणि हत्तींमधील सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी एक मोठा हत्ती जकूझी देखील आहेत. सध्या प्रकल्पात 200 हून अधिक हत्ती असून विशेष प्रशिक्षित कर्मचार्यांकडून चोवीस तास यांची काळजी घेतली जाते.
पशुवैद्यक, जीवशास्त्रज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, पोषणतज्ञ आणि निसर्गतज्ञांसह 500 हून अधिक लोक या कामात गुंतलेले आहेत. गुजरातमधील जामनगर येथील मोती खाबधी गावात 280 एकर जागेवर ’ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन किंगडम’ उभारले जात आहे. या प्राणीसंग्रहालयात कोमोडो ड्रॅगन, चित्ता, आफ्रिकन सिंह यांच्यासह सुमारे 100 प्रजातींचे प्राणी आणि पक्षी आहेत, असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी यांनी सांगितले.
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी प्राणिसंग्रहालयाच्या उभारणीची सर्व जबाबदारी सांभाळत आहे. एका खास मुलाखतीत अनंत अंबानी म्हणाले की, जामनगरमध्ये निर्माणाधीन प्राणीसंग्रहालयात दुर्मिळ प्रजातींचे प्राणी असतील. यात फ्रॉग हाऊस, ड्रॅगन आयलंड, रॉडेंटची जमीन, जलीय साम्राज्य यासह अनेक विभाग असतील तसेच आफ्रिकन सिंह, चित्ता, जग्वार, लांडगे, पाणघोडे, ऑरंगुटान, बंगाल वाघ यासह परदेशातील अनेक प्राणी येथे पाहायला मिळतील.
अलीकडेच त्यांनी मध्य अमेरिकन प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निमंत्रणावरून अनेक मोठे प्राणी आणले आहेत. इत्यादी सर्व बचाव आणि पुनर्वसन कार्य भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पालन करून केली जातात, असे अनंत अंबानी यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











