nandani hatti news : हजारोंच्या उपस्थितीत नांदणीच्या महादेवी ह्रत्तीला निरोप

SHARE:

 nandani hatti news : हजारोंच्या उपस्थितीत नांदणीच्या महादेवी ह्रत्तीला निरोप: नांदणी (ता.शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाचा ‘माधुरी उर्फ महादेवी’ हत्तीणला वनताराला पाठविण्याबाबतचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम करत सर्वोच्च न्यायालयाने नांदणी मठाची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सोमवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत व अश्रूंच्या ओगात ‘महादेवी हत्तीण’ची बिदाई केली. त्याचबरोबर नांदणी गावातून प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत भव्य मिरवणुक काढून वनताराच्या पथकाकडे ‘महादेवी हत्तीण’ला सुपूर्द केले.

nandani hatti news : हजारोंच्या उपस्थितीत नांदणीच्या महादेवी ह्रत्तीला निरोप

अश्रूंच्या ओगात ‘महादेवी हत्तीण’ची बिदाई

प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवून नांदणी येथील ‘माधुरी उर्फ महादेवी हत्तीण’ला गुजरात येथे 2 आठवड्यात पाठविण्याचे परवानगी दिली होती. त्यानुसार गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात नेण्यासाठी सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात हे पथक दाखल झाले होते.

नांदणी मठाने उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर शुक्रवारची सुनावणी सोमवारी झाली. यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाम कायम ठेवून नांदणी मठाची याचिका फेटाळून लावली. सोमवारी सायंकाळी डीवायएसपी डॉ.रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी मठात धाव घेऊन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हत्तीला सुपूर्द करावी असे सांगितले. यावर मठाने न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला जाणार नाही. हत्तीची बिदाई विधी व गावातून मिरवणुक काढून हत्ती सुपूर्द करत असल्याची सांगितले.

हत्ती सोमवारी रात्री जाणार हा निरोप पंचक्रोशीत पोहोचण्याने हजारो नागरिकांनी नांदणीत धाव घेतली. निशीधी येथून जनसमुदायाच्या उपस्थितीत स्वस्तिश्री जिनसेन भट्टाटक पट्टाचार्य महास्वामी संस्था मठात हत्ती आणण्यात आला. यावेळी स्वस्तिश्री जिनसेन भट्टाटक पट्टाचार्य महास्वामी, महिला, पुरुष व सर्वधर्मीय नागरिकांनी हांबरडा फोडला. आमच्या माधुरीला कसे पाठवायचे? 35 वर्षे आम्ही सांभाळले असे म्हणत प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर वाहात होता. अखेर बिदाईचे धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर हत्तीणला मठाबाहेर आणण्यात आले आणि गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुक काढण्यात आली.

also read this
महादेवीच्या पावलांनी नांदणीची माती पुन्हा ओलावली
नांदणी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

nandani-hatti-news-farewell-to-nandanis-mahadevi-hrati-in-the-presence-of-thousands

‘महादेवी हत्तीण’ आम्हाला सोडून जाणार या भावनेतून प्रत्येक महिला हत्तीच्या पायावर पाणी घालून आवशण करीत अश्रू ढाळत होत्या. प्रचंड अशा जनसमुदायातून हत्तीणची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर हत्तीणला पुन्हा निशीधीवर आणण्यात आले. यानंतर वनताराच्या वाहनातून हत्तीची रवानगी केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *