nandani elephant news : नांदणी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली: नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्तीण नांदणी मठातच राहिली पाहिजे. या मागणीसाठी मठाकडून दाखल करण्यात आलेली याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे हत्तीणीला वनतारा केंद्राकडे पाठविण्याचा आदेश कायम राहिला आहे.
nandani elephant news : नांदणी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महादेवी हत्तीणीला गुजरातला पाठवण्याचा निर्णय कायम
मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यात हत्तीणीला गुजरात येथे पाठवण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांबले आहे.
मात्र, हत्तीनीला वनतारा केंद्रात कोणतेही परिस्थितीत देणार नाही ही भूमिका घेत हत्तीण बचावासाठी गाव बंद ठेवत नागरिकांनी मूक मोर्चा काढून विरोध दर्शवला होता.
nandani-elephant-news-supreme-court-rejects-nandani-maths-petition
नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मठाकडेच हत्तीण राहण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज, सोमवारी सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत मठाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे महादेवी हत्तीणीला वनतारा केंद्राकडे पाठवावे लागणार आहे.
also read this
महादेवीच्या पावलांनी नांदणीची माती पुन्हा ओलावली
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











