zp election 2025 : जिल्हा परिषदेची अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबरला : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची प्रारुप मतदार यादी जाहीर करून आक्षेप मागविले होते. तसेच आक्षेप निकाली काढून 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. दुबार नावे वगळण्याची कार्यवाही पूर्ण करून 3 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
zp election 2025 : जिल्हा परिषदेची अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबरला
जिल्हा परिषदेचे 61 गट आणि पंचायत समितीचे 122 गण आहेत. जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आतापर्यंत गट, गणाची रचना, आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली. प्रारुप मतदार यादीही प्रसिद्ध केली. नगरपरिषदांच्या प्रारुप मतदार यादीत मोठा घोळ झाला. त्यामुळेच 17 हजारांवर आक्षेप दाखल झाले. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या प्रारुप मतदार यादीवर नाममात्र आक्षेप होते.
आक्षेप निकाली काढून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 27 ऑक्टोंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादीसंबंधी सुधारित आदेश काढून मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील गोंधळून गेले आहेत. जिल्हा परिषदेच्या 61 गटातील मतदार यादीच्या प्रारूपावर आक्षेप सुनावगी झाली आहे. रविवारी अंतिम यादी येणार होती, मात्र आता 3 नोव्हेंबरपर्यंतची मुदत वाढविली आहे.
3 नोव्हेंबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रामाणित करून त्या करून त्या माहितीसाठी ठेवण्यात येत असल्याची सूचना प्रसिद्ध करावी. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची याची व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम एक आठवडा लांबणीवर गेला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











