zp election news : जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या उद्यापासून मुलाखती

SHARE:

zp election news : जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या उद्यापासून मुलाखती : भाजपच्यावतीने व प्रदेश भाजपच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवार (दि.17) आणि रविवार (दि. 18) रोजी सांगलीतील खरे सांस्कृतिक भवन येथे घेण्यात येणार आहेत. मुलाखतीसाठी शक्तिप्रदर्शन करु नये, इच्छुक उमेदवाराने अर्जासहित यावे, असे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांनी केले.

zp election news : जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या उद्यापासून मुलाखती

सांगलीत दोन दिवस तालुकानिहाय मुलाखती होणार ः सम्राट महाडीक

जिल्हाध्यक्ष महाडीक म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी पक्षाकडे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती पक्षाच्या निवडलेल्या कोअर कमिटीमार्फत घेण्यात येणार असून उमेदवारांची निवड ही कार्यक्षमता, जनसंपर्क, संघटनात्मक कामगिरी व पक्षनिष्ठा या निकषांवर केली जाणार आहे. मुलाखतीस येताना कोणत्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन करू नये, तसेच प्रत्येक इच्छुक उमेदवाराने एकट्यानेच आपल्या अर्जासहित उपस्थित राहावे, असे स्पष्ट आदेशही दिले आहेत.

जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे इच्छुक उमेदवार या दोन दिवसांत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहेत. 17 जानेवारी रोजी मुलाखतींचे वेळापत्रक सकाळी 9.30 ते 11.00 – तासगाव, 11.00 ते 12.00 – कवठेमहाकाळ, 12.00 ते 1.00 – आटपाडी, 1.00 ते 2.00 – खानापूर, 2.30 ते 3.30 शिराळा, 3.30 ते 4.30 – कडेगाव, 4.30 ते 5.30 – पलूस.

रविवार (दि. 18) रोजी जानेवारी रोजी मुलाखतींचे वेळापत्रक सकाळी 9.00 ते 11.00 – मिरज, 11.00 ते 1.00 – वाळवा, 1.30 ते 3.30 – जत वेळेत होणार आहेत. या सर्व मुलाखती जिल्हाध्यक्ष, आमदार व प्रमुख नेते घेणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि संघटनात्मक शिस्त पाळली जाणार असल्याचेही महाडीक यांनी सांगितले.

संबधित तालुक्यांना दिलेल्या वेळेत मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहून पक्षाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. या मुलाखतीतून सक्षम, जनतेशी जोडलेले व विकासाभिमुख उमेदवार निवडले जाणार असल्याने येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप अधिक ताकदीने उतरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *