zp election news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशिन नसणार ; निवडणूक आयुक्तांची माहिती : नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. त्याच अनुषंगाने निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली असून राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज नाशिक जिल्ह्यात जाऊन आढावा घेतला. नाशिक विभागाअंतर्गत जेवढे जिल्हे येतात, त्यातील मनपा, झेडपी आणि नगरपालिका यांच्या निवडणुकांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाध साधला. यावेळी, आगामी निवडणुकांची माहिती दिली. त्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशिन नसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
zp election news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशिन नसणार ; निवडणूक आयुक्तांची माहिती
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी, मतदान केंद्राची संख्या निश्चित करणे, मतदान यंत्राची व्यवस्था करणे, निवडणुकांसाठी आवश्यक असणार्या अधिकारी कर्मचारी संख्याचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी आज नाशिक दौरा केला. यावेळी, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने माहितीही दिली. नाशिक विभागात 50 लाख 45 हजार मतदार आहेत, 4 हजार 982 मतदान केंद्र, त्यासाठी 8 हजार 705 कँट्रोल युनिट लागणार असून 17 हजार मतदान यंत्रांची गरज भासणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, दिवाळीनंतरच निवडणुकांचा बिगुल वाजेल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिन नसणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
व्हीव्हीपॅट मशिन राहणार नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व इलेक्शन एकत्रित करणेसाठी मनुष्यबळ कमी पडेल. त्यामुळे टप्याटप्याने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पण पहिले कोणते इलेक्शन होईल ते अद्याप निश्चित नाही. ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकियेला सुरुवात होईल. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकसाठी मशिन राहणार नाही, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
निवडणूक आयोगाचा निर्णय तुघलकी – अंधारे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट नसेल हा निवडणूक आयोगाचा निर्णय नुसता तुघलकीच नाही तर एकूण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे, असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच, व्हीव्हीपॅट गायब करण्यापेक्षा औपचारिकता म्हणून निवडणुकीचा जो फार्स करत आहात तो फार्स न केलेला बरा, असेही त्यांनी म्हटले.
zp-election-news-there-will-be-no-vvpat-machines-in-local-body-elections-information-from-the-election-commissioner
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोगाच्या 17 जून 2025 च्या सूचनांनुसार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघांमधील मतदार युनिट, नियंत्रण यंत्र व व्हीव्हीपॅट यांची तपासणी केली. सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केल्या व व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नाही.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











