zp election news : जिल्हा परिषद निवडणूक बुधवारी जाहीर होण्याची शक्यता : महापालिका निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच नवीन वर्षात जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे निवडणूक कधी होणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
zp election news : जिल्हा परिषद निवडणूक बुधवारी जाहीर होण्याची शक्यता
अजित पवार म्हणाले की, महापालिकेनंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होतील. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आधी होईल. बुधवार 7 किंवा 8 या दरम्यान निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे. तर, विदर्भ आणि इतर भागातील 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक दुसर्या टप्प्यात होणार आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 50 टक्क्यांच्या आता आरक्षण मर्यादा असलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्या टप्प्यात महापालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला लागताच लगेच जाहीर होण्याची शक्यता आहे.
20 जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारीत?
पहिला टप्प्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर दुसर्या टप्प्यात आरक्षाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून या निवडणूका होतील. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोलीचा समावेश आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











