khatav crime news : खटाव येथील घोरपडे वस्तीवर दरोडा : कुटुबीयांना मारहाण

SHARE:

khatav crime news : खटाव येथील घोरपडे वस्तीवर दरोडा : कुटुबीयांना मारहाण : मिरज तालुक्यातील खटाव येथील घोरपडे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे सातते आठ जणांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला. घरातील दिड तोळ्याचे गंठण व मोबाईल चोरून घोरपडे कुटुंबियांना मारहाण करून पलायन केले. मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

khatav crime news : खटाव येथील घोरपडे वस्तीवर दरोडा : कुटुबीयांना मारहाण

खटाव पासून काही अंतरावर घोरपडी वस्तीवर महादेव रामचंद्र घोरपडे यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते एक या वेळेत अंदाजे सात ते आठ जण महादेव घोरपडे यांचा घराचा दरवाजा वाजविला . महादेव घोरपडे यांनी कोण आहे म्हणत दखाजा उघडला. एकदम सातते आठ जण घरात घुसून महादेव घोरपडे व त्यांच्या पत्नी सुमन घोरपडे या दोघांवर चाकूने व काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

घोरपडे हे अतिशय घाबरले होते. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता महादेव घोरपडे यांना कपाळावर , डोक्याच्या पाठीमागे चाकूने वार केला आणि मांडीवर पोटावर ,हातावर काठीने मारल्याने हात फॅक्चर झाला आहे . महादेव यांच्या पत्नीला मारहाण करीत कानातील सोन्याचे कर्णफुले ओढून घेतल्याने कान फाटले तर महादेव यांची पत्नी सुमन यांना खालीपाडून गळ्यातील मंगळसूत्र तोडले.

तसेच मोबाईल व कपाटातील वस्तू विस्कटले महादेव घोरपडे आणि त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला. दरोडेखोरांच्या मारहाणीत महादेव घोरपडे व त्यांच्यापत्नी जखमी झाल्या. अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होते.नवीन वर्षाच्या प्रारंभी खटाव गावामध्ये मोठा जबरी चोरीचा प्रकार घडल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे .

जबरी चोरीचे प्रकार मिरज ग्रामीण पोलीस ठाणे समजल्यानंतर मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अजित सिद व पोलिस कर्मचारी रात्री उशीरापर्यंत चौकशीसाठी उपस्थित होते. तसेच डी.वाय.एस .पी भागवत सांगली विभाग उपस्थित होते .तसेच सांगली क्राईम ब्रँच प्रमुख संजीव झाडे, एपीआय सुनील गुरव, फॉरेन्सिक विभागाची टीम व श्वान पथकचे कर्मचारी रात्री उपस्थित होते. श्वानाने कर्नाटक सीमेपर्यंत गेल्यानंतर घटमळले.

खटाव हे गाव कर्नाटक सीमेवरील असल्याने या गावांमध्ये आणि महाराष्ट्राच्या हद्दीत सारखे चोरीचे प्रमाण घडत असल्याने गावात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. गावाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे मळा भाग कर्नाटकच्या सीमेजवळ आहे. चोरटे चोरी करून कर्नाटक हद्दीत पळून गेल्याचे संशय व्यक्त केले जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *