islampur expo news : इस्लामपुरातील ’बिझनेस एक्स्पो मध्ये नाना पाटेकर, सत्यजित नांबे, किरण माने यांचे व्याख्यान : इस्लामपूर बिझनेस फोरम (आयबीएफ) तर्फे दि.18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान इस्लामपूर येथील आ.जयंतराव पाटील खुल्या मैदानात आयोजित ’बिझनेस एक्स्पो 2025’ या व्यावसायिक प्रदर्शनाचे उदघाटन मंगळवार दि.18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता सुप्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर, शुभेन्दू शर्मा यांच्या हस्ते केले जाणार आहे.
islampur expo news : इस्लामपुरातील ’बिझनेस एक्स्पो मध्ये नाना पाटेकर, सत्यजित नांबे, किरण माने यांचे व्याख्यान
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील या समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. ही माहिती इस्लामपूर बिजनेस फोरमचे संस्थापक व राजारामबापू साखर कारखान्या चे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी आयबीएफचे अध्यक्ष विकास राजमाने,उपाध्यक्ष प्रवीण फल्ले,नवाज पटवेकर उपस्थित होते.
नवीन संकल्पना असलेल्या उद्योगांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे देणार आहोत.
प्रतीक पाटील म्हणाले,मंगळवारी दि.18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता नेत्रा इन्क्युबेशन सेंटरतर्फे नवउद्योजकांसाठी आयडियाथॉन 2025 चे आयोजन केले आहे. नवीन संकल्पना असलेल्या उद्योगांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे देणार आहोत. बुधवारी 19 फेब्रुवारीला नेत्रा आरआयटीतर्फे नव उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध सिनेअभिनेते पुरोगामी विचारवंत किरण माने यांचे शिवजयंतीनिमित्त ’छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्योजकीय प्रेरणा’ या विषया वर खास व्याख्यान होणार आहे. गुरुवारी, 20 फेब्रुवारीला दुपारी रेडिओ शुगरतर्फे यशवंत, गुणवंत व्यावसायिकांच्या मुलाखतींचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच सायंकाळी 7 वा.आमदार व युवा उद्योजक सत्यजित तांबे यांचे व्याख्यान होणार आहे.
शुक्रवारी 21 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता आरआयटीचे कलावंत संगीत मेहफिल सादर करणार आहेत.
दुपारी 4 वाजता एक्सपोचा समारोप होणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण,प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील,शामल खोत, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
वाय फाय डब्बा डॉट कॉम,चातक ड्रोन आणि राजाराम कन्झ्युमर केअर प्रायोजक आहेत.
सुमारे 25 ते 50 हजार नागरिकांनी या व्यावसायिक प्रदर्शनाला भेट द्यावी तसेच सुमारे 10 कोटी रुपयांची उलाढाल व्हावी,हा उद्देश ठेवून एक्स्पोचे नियोजन केलेले आहे. सर्व उद्योग व्यवसाय एकाच छताखाली नागरिकांना पाहायला,अनुभवायला मिळणार आहेत. शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिक,युवकांनी व विद्यार्थ्यांनी या व्यवसाय प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी,असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.
सचिव विश्वजित पवार,प्रवीण पाटील, शहाजी पाटील,महेश ओसवाल,स्वरूप साळुंखे,वैभव पाटील,मोहन जाधव,राजू उर्फ उदय देसाई,धीरज भोसले,जयदीप पाटील, भगतसिंह पाटील,सुप्रिया पेटकर,पुष्पलता खरात,संग्राम पाटील आदी संयोजन करत आहेत.
प्रेक्षकांच्यासाठी लकी ड्रॉ॥
चार दिवस होणार्या या व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी होणार्या नागरिकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले आहे. भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत.
फोटो – सिने अभिनेते नाना पाटेकर,किरण माने,आ.सत्यजित तांबे

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.