pratik patil news : प्रगल्भ व युवा नेतृत्व..; प्रतिकदादा पाटील!!

SHARE:

-विजयराव बळवंत पाटील, अध्यक्ष,वाळवा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

pratik patil news : प्रगल्भ व युवा नेतृत्व..; प्रतिकदादा पाटील!!: महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांचा आज शनिवार दि.19 जुलै रोजी वाढदिवस..त्यानिमित्त चार शब्द

pratik patil news : प्रगल्भ व युवा नेतृत्व..; प्रतिकदादा पाटील!!

लोकनेते राजारामबापू पाटील,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्यानंतर तिसर्‍या पिढीचे प्रतिनिधी म्हणून प्रतिकदादा पाटील वाळवा तालुक्याच्या,सांगली जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत झाले आहेत. स्व.बापूंनी वाळवा तालुक्याला विधायक वळण दिले,विविध सहकारी संस्थांच्या जाळे विणून वाळवा तालुक्यातील सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावले..स्व.बापू खर्‍या अर्थाने वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते ठरले आहेत.

आ.जयंतराव पाटील हे बापूंच्या अकाली निधनाने आपले उच्च शिक्षण बाजूला ठेवून वाळवा तालुक्यातील सर्व सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर सार्वजनिक व राजकीय जीवनात आले..त्यांनी स्व.बापूंनी उभा केलेल्या सहकारी संस्था जीवापाड जपत या संस्थांचा विस्तार केला. त्यांनी वाळवा तालुक्यातील शिवारात पाणी आणून वाळवा तालुक्याच्या प्रगतीस क्रांतिकारक चालना दिली आहे. वाळवा तालुक्याची आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व वैचारिक प्रगती ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा साक्ष आहे.

त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात अर्थ,गृह,ग्रामविकास व जलसंपदा अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी पेलताना राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान केलेले आहे. एक अभ्यासू, स्वच्छ व चारित्र्यसंपन्न नेता म्हणून राज्यात त्यांची ओळख आहे आणि हाच समृद्ध वारसा घेऊन प्रतिकदादा पाटील सार्वजनिक क्षेत्रात काम करीत आहेत.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना हा वाळवा तालुक्याच्या विकासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. ही तालुक्यातील एक मातृ संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रतिकदादा पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ऊस उत्पादक सर्वसामान्य शेतकर्‍यां च्यासाठी ठिबक सिंचन योजना,सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली,ऊसाची 25 लाख शुध्द रोपे शेतकर्‍यांना बांध पोच,अल्प दरात शेती साहित्य आदी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यास शेतकर्‍यांना चा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

pratik-patil-news-profound-and-youthful-leadership-pratikdada-patil

आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ड्रोन द्वारे औषध फवारणी आणि त्याच्या पुढे जाऊन मल्टी स्पेक्ट्रम ड्रोनचा वापर करणारा राजारामबापू साखर कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना आहे.. यातून त्यांची दूरदृष्टी आणि शेतकर्‍यांच्या हिताची तळमळ दिसून येते..आपल्या परिसरातील मुले व मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहावे,या भावानेने त्यांनी राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्ट मधून आर्थिक सहाय्य योजना पुन्हा सुरू केली आहे.

कारखान्यातील अधिकारी व कामगार अधिक अपडेट हवे,म्हणून त्यांच्या संकल्पनेतून विविध ट्रेंनिग आयोजित केली जात आहेत. इतकेच नव्हे,तर साखर नेण्यासाठी साखर कारखान्यावर आलेल्या सभासदांना सावली,पिण्याचे पाणी आणि शौचालयासारख्या सुविधा मिळतात का? याकडे ही बारीक लक्ष देत या सुविधा उभा केल्या आहेत.

प्रतिकदादा हे गेल्या काही महिन्यापासून गावोगावी संपर्क दौरा करून ऊस उत्पादक सर्वसामान्य शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत,त्यांच्या अडी-अडचणी समजून घेत आहेत..यातून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याच्या सभासदांशी असलेले जिव्हाळ्याचे ऋणानुबंध अधिक दृढ केले जात आहेत.
स्व.बापू व आ.जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यात सशक्त व बलवान युवा पिढी निर्माण व्हावी,या भावनेने कुस्ती,कबड्डी, व्हॉलीबॉल आदी विविध खेळांना सातत्याने प्रोत्साहन व पाठबळ दिले आहे. हाच वारसा कायम ठेवत दादांनी खेळ व खेळाडूंना ताकद देण्याचे काम सुरू केले आहे..त्यांच्या पुढाकाराने नुकतेच राजारामबापू इनडोअर स्टेडियममध्ये अद्यावत जीम सुरू करण्यात आली आहे.

या जीममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोई-सुविधा देण्यात आल्या आहेत. राजारामबापू कुस्ती केंद्रातील मल्लांच्या मानधन कुस्ती स्पर्धा सुरू केल्या आहेत. राजारामबापू क्रीडा संकुलातील खुल्या मैदानावर दररोज सुमारे 2-3 हजार युवक स्पर्धा परीक्षेचा सराव करतात..या युवकांना दादा सातत्याने प्रोत्साहन देत असतात. इनडोअर स्टेडियममधील शेकडो युवक दादांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनमध्ये जिल्हा व राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करीत आहेत.

दादा हे शांत,संयमी,मायाळू व हळव्या मनाचे आहेत. त्यांनी मुक्या प्राण्यांच्यावर उपचार करण्यासाठी सारथी अँनिमल रेस्क्यू सेंटर सुरू केलेले आहे. या सेंटरमध्ये आजारी व अपघातग्रस्त प्राण्यांच्यावर उपचार करून त्यांचा सांभाळ केला जातो..दादांची सार्वजनिक कार्याची सुरुवात ही जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या माध्यमातून झाली आहे. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,तोच साधू ओळखावा,देव तेथेचि जाणावा, या संत युक्तीप्रमाणे वाळवा तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील गोर-गरीब जनतेच्या उन्नतीसाठी,त्यांच्या आरोग्य,
शिक्षण,स्वयंरोजगारासाठी दादा अहोरात्र काम करीत आहेत.

वाळवा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेस अद्यावत आरोग्य सुविधा देण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने कापुसखेड नाका येथील नर्सिंग कॉलेजमध्ये श्रीमती कुसुमताई आरोग्य केंद्र (ओपीडी) सुरू करण्यात आली आहे…वाळवा तालुक्यातील युवा उद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी त्यांच्या दुरदृष्टीतून सुरू केलेली इस्लामपूर बिझनेस फोरम (आय बी एफ) ही संस्था आज राज्या तील एक नामवंत संस्था म्हणून ओळखली जाते.

त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या तालुक्या मध्ये युवकांचे मजबूत संघटन उभा राहीले आहे..समाजातील शेतकरी,शेतमजूर, कामगार,युवक,महिला आणि उपेक्षित, गोर-गरीब वर्गाच्या प्रगतीसाठी ते कष्ट घेत आहेत. स्व.बापूंना तालुक्यातील जनतेचे अलोट प्रेम मिळाले..आ.जयंतराव पाटील यांचे नेतृत्व तालुक्यातील जनतेने तळहाता वरील फोडाप्रमाणे जपले आहे..तेच प्रेम आणि आशिर्वाद प्रतिकदादांना मिळत आहेत..हे युवा नेतृत्व असेच अधिक भरत जावो आणि त्यांच्या हातून वाळवा तालुका, सांगली जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेची उत्तम सेवा घडो,याच त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

शब्दांकन-विश्वनाथ पाटसुते

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *