jayant patil news : विधिमंडळात माझं हे 36 वं वर्षे, 36-37 वर्षांत असं अधिवेशन कधीच पाहिले नाही !

SHARE:

jayant patil news : विधिमंडळात माझं हे 36 वं वर्षे, 36-37 वर्षांत असं अधिवेशन कधीच पाहिले नाही ! :  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील आणि गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. या दरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

 

jayant patil news : विधिमंडळात माझं हे 36 वं वर्षे, 36-37 वर्षांत असं अधिवेशन कधीच पाहिले नाही !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली खंत

जन सुरक्षा विधेयकाबाबतीत सरकारने विरोधी पक्षाची फसवणूक केली

कर्जमाफीचा विचार हे 2029 लाच निवडणुकीच्या तोंडावर करतील

जयंतराव पाटील म्हणाले की, विधिमंडळाच्या आवारात पाच ते दहा हजार लोक एकावेळी असतात. अनेक वेळा सभागृहात मी अधिकृतपणे हे मांडलेल आहे की पास देण्यावर मर्यादा असाव्यात, येथे चालायलाही जागा मिळत नाही. पण आम्ही वारंवार सांगूनही पास देण्याची व्यवस्था होताना दिसते. त्यामुळे विधानसभेतील सुरक्षा रक्षक आहेत

त्यांनाही कोण अधिकृत आणि कोण अनधिकृत आहे कळत नाही. दुर्दैवाने सध्या काही आमदारांचा सहवास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबरोबर जास्त वाढलेला आहे. आमदारांचे जे समर्थक गुन्हेगार आहेत ते एवढे शिरजोर होतात की ते आमदारांच्या अगोदर आत येतात. विधिमंडळातील हे माझं छत्तीसावं वर्ष आहे. या 36-37 वर्षांमध्ये मी यापूर्वी कधीही अपप्रवृत्तीच्या व्यक्ती सभागृहात किंवा आवारात आलेल्या पाहिलेल्या नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जन सुरक्षा विधेयकावर बोलताना ते म्हणाले की, जन सुरक्षा विधेयकाच्या बाबतीत आम्ही संयुक्त समितीत असताना काही सुचना केल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण ज्या दिवशी बिल सभागृहाच्या समोर आलं. त्यावेळी कमिट केलेला गोष्टी विधेयकात नव्हत्या.

आम्ही सांगितलेले तीन ते चार मुद्दे त्यांनी मंजूर केले पण आम्ही सांगितलेल्या बर्‍याच सुचना त्यांनी विधेयकात घेतल्या नाहीत. सरकारने एकाप्रकारे विरोधी पक्षाची फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला. आज आम्ही राज्यपालांची भेट घेऊन जे मुद्दे शंकास्पद आहे ते राज्यपाल महोदयांना कळवले तसेच हा विधेयकावर पुनर्विचार करण्याची विनंती केली अशी माहिती त्यांनी दिली.

jayant-patil-news-this-is-my-36th-year-in-the-legislature-i-have-never-seen-such-a-session-in-36-37-years

महाविकास आघाडी सरकारच्या काळात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही कर्जमाफी दिली ती काही समिती नेमून आम्ही केली नव्हती. अधिकारी नेमून वेळकाढूपणा करणे म्हणजे शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसणे आहे असं म्हणत त्यांनी सरकारला कोंडीत पकडले तसेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यायचाच असेल तर ते 2029 साली निवडणुकीच्या तोंडावर करतील. आता समिती नेमतोय इतकं सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मते मिळवण्याचा सरकारचा डाव आहे असा टोलाही जयंतराव पाटील यांनी लगावला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *