nandre crime news : नांद्रेत महिलेस सासरच्या मंडळींनी केली मारहाण : घरगुती कारणावरुन महिलेस सासरकडील लोकांनी लाथाबुक्कयांनी मारहाण केल्याची घटना गुरुवार दि. 04 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुमारास मिरज तालुक्यातील नांद्रे येथे घडली. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात जखमी जयश्री सतीश पाचोरे (वय 40, रा. नांद्रे,) यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित जाऊ पद्मश्री पाचोरे, सुहास पाचोरे, सासरे जयप्रकाश पाचोरे आणि उषादेवी पाचोरे (सर्व रा. नांद्रे ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
nandre crime news : नांद्रेत महिलेस सासरच्या मंडळींनी केली मारहाण
सासू, सासर्यांसह चौघांवर गुन्हा
याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी जयश्री पाचोरे या आपल्या पती, सासू सासर्यांसह मिरज तालुक्यातील नांद्रे गावामध्ये राहतात. गुरुवार दि. 04 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जयश्री पाचोरे या घरी असताना संशयित त्याठिकाणी आले. तेथे त्यांनी जयश्री यांच्याशी वाद घातला.
nandre-crime-news-woman-beaten-up-by-in-laws-in-nandre
यावेळी संशयितांनी जयश्री यांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. यावेळी सुहास पाचोरे याने फिर्यादी जयश्री यांना केस धरुन ओढले तर जाऊ पद्मश्री हिने कुकर घेवून तीला मारहाण केली. सासरे जयप्रकाश यांनी देखील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











