miraj political news : दादांचा सणसणीत हिसका आणि आवटींचा ठणकावलेला प्रत्युत्तर!: मिरजमध्ये गुरुवारी रात्री महायुतीच्या आयोजित बैठकीत चांगलंच राजकीय नाट्य रंगलं. ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांना बैठकीसाठी निमंत्रण न मिळाल्यामुळे त्यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक संदीप आवटी थेट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरच बरसले. यावर चंद्रकांतदादांनीही परखड शब्दांत उत्तर दिलं, त्यामुळे वातावरण एकदम तापलं.
miraj political news : दादांचा सणसणीत हिसका आणि आवटींचा ठणकावलेला प्रत्युत्तर!
तुम्ही कोण लागून गेलात त्यांना बोलवायला? असा थेट सवाल करत दादांनी संदीप आवटींना सुनावलं. त्यांनी यावेळी सांगितलं की, तुमची भूमिका निवडणुकांत पक्षविरोधी होती. सांगलीत अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात तुम्ही सक्रिय होता. जिल्हाध्यक्षाचा अवमान मी सहन करणार नाही.
संदीप आवटी मात्र माघार घेणारे नव्हते. मिरजेत आम्ही पक्षासाठी राबलो. पण सांगलीत दादांच्या गोटातील काही मंडळींनी वहिनींचा छुपा प्रचार केला. अपमान गिळून आम्ही पक्षाचं काम करणार नाही. आत्ता राजीनामा देतो, असा थेट इशारा त्यांनी दिला. यानंतर त्यांनी आणि निरंजन आवटींनी बैठक अर्धवट सोडून तिथून न जेवताच काढता पाय घेतला.
दादांना कुणीतरी भडकावलंय
ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांनी स्पष्टपणे सांगितलं की, दादांना चुकीची माहिती देण्यात आली आहे. आम्हाला बैठकांची माहिती दिली जात नाही. आम्ही काही लपूनछपून केलं नाही. उलट लपवाछपवी करणारे त्यांच्याच जवळचे लोक आहेत.
आगामी रावणदहन कार्यक्रम आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत राजकीय उकल होण्याऐवजी अंतर्गत घोळच समोर आला. त्यानिमित्ताने
महायुतीतल्या ‘एकी’चं सैरभैर चित्र पुन्हा एकदा उजेडात!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











