rajarambapu kharkhana news : राजारामबापू कारखान्याचा जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटीचा भरणा

SHARE:

rajarambapu kharkhana news : राजारामबापू कारखान्याचा जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटीचा भरणा: राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने सांगली जिल्ह्यात सर्वाधिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरल्याबद्दल केंद्र शासन व रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या मार्फत सांगली येथे राजारामबापू साखर कारखान्याचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील कारखान्याच्या आर्थिक सक्षमता व शिस्तीचे कौतुक करण्या त आले.

rajarambapu kharkhana news : राजारामबापू कारखान्याचा जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटीचा भरणा

खा.विशाल पाटील,केंद्रीय जीएसटी, कोल्हापूर आयुक्तालयाचे सहआयुक्त रोहित जोशी,ज्येष्ठ उद्योजक दीपक शिंदे,अँड. विद्याधर आपटे,राज्य जीएसटी,अन्वेषण विभाग पुणेचे उपायुक्त सुनील कानगुडे, केंद्रीय जीएसटी सांगली विभागाचे सहायक आयुक्त यु.के.सतीश यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखानाचे मुख्य अकाऊंटंट संतोष खटावकर यांनी जेष्ठ उद्योजक दीपक शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान स्विकारला. यावेळी ’राजारामबापू’च्या अकाऊंट विभागाचे आनंदा देवकुळे,कैलास कोळी,विशाल दिंडे,सुजित पाटील,रमेश शिंदे तसेच कर सल्लागार ड. किशोर लुल्ला,मोहनराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे,उद्योजक उज्वल साठे,विनोद पाटील,शांतिनाथ पाटील यांच्यासह करदाते,कर सल्लागार उपस्थित होते.

रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय कुलकर्णी, केंद्रीय जीएसटी निरीक्षक राजेंद्र मेढेकर, प्रमोद चौगुले,विनायक काळे,स्वप्नील पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *