ashta nagarpalika news : आष्ट्यात नगराध्यक्ष पदासह सह सर्व जागा एकदिलाने सर्व लढणार: आगामी 2025 च्या आष्टा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले. विविध पक्षांनी एकमुखाने निर्णय घेत, “नगराध्यक्ष पदासह सर्वच जागांवर आमचे उमेदवार रिंगणात उतरतील” अशी घोषणा करत निवडणुकीच्या रणशिंगाला जोरदार नाद दिला.
ashta nagarpalika news : आष्ट्यात नगराध्यक्ष पदासह सह सर्व जागा एकदिलाने सर्व लढणार
या सभेत भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस, मनसे, आरपीआय, रयत क्रांती संघटना आदी पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले. प्रत्येक पक्षाने आपल्या ताकदीवर विश्वास ठेवत “आष्टा आपलीच!” असा नारा दिला.
बैठकीला भाजपचे मंडलाधिकारी अमोल पडळकर, शिवसेना (शिंदे गट) वाळवा तालुका संघटक वीर कुदळे, उबाठा गटाचे पोपटभाऊ भानुसे, काँग्रेसचे राहुल थोटे, मनसेचे राजकुमार सावळवाडे, भाजपचे अनुप वाडेकर, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख राकेश आटूगडे व नंदू आटूगडे, शिवसेना वाळवा तालुका उपप्रमुख दिलीप कुरणे, आरपीआयचे प्रदीप आवळे, भाजपचे विनोद बसुगडे, नरेंद्र घाटगे, अभिजीत बिरनाळे, विनोद कांबळे, तसेच बापूसाहेब सेवाभावी संस्थेचे संग्राम शिंदे, श्रीराम ढोले, आणि रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग बसुगडे उपस्थित होते.
बैठकीत सर्वांनी ठाम शब्दांत स्पष्ट केले की — “आष्टा नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाची तडजोड नाही. जनता आमच्या कामावर आणि वचनावर विश्वास ठेवते, त्यामुळे यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.”
राजकीय वर्तुळात या घोषणेनंतर आष्ट्याचे वातावरण एकदम तापले असून, आगामी दिवसांत शहरात रंगणार आहे खरी ‘राजकीय लढत’ — एकेका जागेसाठी काट्याची टक्कर आणि प्रत्येक मतासाठी झुंज
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











