belankhi accident news : बेळंकीत डंपरखाली चिरडून दुचाकीस्वार ठार

SHARE:

belankhi accident news : बेळंकीत डंपरखाली चिरडून दुचाकीस्वार ठार : मिरज तालुक्यातील बेळंकी येथे मुरूम वाहतूक करणार्‍या एका डंपरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात भीमराव बाळासो कोरे (वय 35) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

belankhi accident news : बेळंकीत डंपरखाली चिरडून दुचाकीस्वार ठार

याबाबत अधिक माहिती अशी की, बेळंकी येथून मिरजच्या दिशेने जाणारा एमएच 10 सीआर 9639 हा मुरूम वाहतूक करणारा डंपर बेळंकी ते सलगरे या मार्गावरील सिद्धेश्वर मंदिराजवळ आला असता, त्याने समोरून रस्त्याच्या कडेला जात असलेल्या एमएच 10 ईबी 5612 या ऍक्टिवा दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत भीमराव माळी हे डंपरच्या मागील चाकाखाली चिरडले गेले. अपघात एवढा भयानक होता की त्यांचा मृतदेह ओळखता येणार नाही अशा स्थितीत झाला होता. डोक्याला गंभीर दुखापत होऊन शरीराचे काही अवयव चाकात अडकले होते, त्यामुळे घटनास्थळावर विदारक दृश्य निर्माण झाले होते.

या धडकेत पलीकडे असलेली एमएच 10 बीएच 6139 ही स्प्लेंडर दुचाकीही अपघातग्रस्त झाली आहे. घटनेची माहिती मिळताच बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

या घटनेनंतर बेळंकी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. या ठिकाणी अनेक दिवसांपासून बेकायदेशीररीत्या मुरूम वाहतूक करणार्‍या वाहनांची वर्दळ सुरू असून, महसूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. घटनेच्या माहिती संदर्भात प्रशासन शी संपर्क करण्यात आला असता आज सुट्टीवर आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मंडलाधिकारी अभी कुमार शेटे यांनी दिली

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मुरूम वाहतुकीवर नियंत्रण आणावे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिरज पूर्व भागातील बेळंकी परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन

या परिसरातील वाहनांमध्येही अवैध उत्खनन होऊन मुरूम जात असून हीत्र कोणतेही कारवाई होत नसल्याने महसूल प्रशासनावर परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाण प्रमाणात रोष आहे या अपघात रस्त वाहनांमध्ये गौण खनिज असल्याने यावेळी हा अपघात घडल्यानंतर अभय कुमार शेटे यांना संपर्क साधला असता त्यांनी आज सुट्टी आहे मी या संदर्भात काही बोलू शकत नाही घटनेची माहिती घ्यावी लागेल असे यावेळी सांगितले मात्र ज्या रोडवर अपघात झाला त्या रोडवर आधी कोणती परवानगी उत्खननास दिली आहे का हे विचारत असताना त्यांनी फोन बंद केला

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *