bhilwadi accident news : हजारवाडीजवळ कार-टँकरच्या धडकेत दोघे ठार

SHARE:

bhilwadi accident news : हजारवाडीजवळ कार-टँकरच्या धडकेत दोघे ठार : हजारवाडी ता. पलुस येथील एचपी गॅस फॅक्टरी पासून तासगाव कडे 1 किलो मिटर अंतरावर तासगाव-भिलवडी मार्गावरील हजारवाडी (ता. पलूस) येथील एचपी गॅस फॅक्टरीजवळ आज दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी झालेल्या भीषण अपघातात बोरगाव (ता. तासगाव) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

bhilwadi accident news : हजारवाडीजवळ कार-टँकरच्या धडकेत दोघे ठार

घटना स्थळा वरून मिळालेल्या माहीती नुसार दूध वाहतूक करणारा टॅकर (क्र. चक 10 ऊढ 3046) आणि चारचाकी फोक्सवॅगन गाडी (क्र. चक 10 एघ 8005) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की चारचाकीचा चक्काचूर झाला. या धडकेत अधिक आनंदा शिंदे (वय 28) आणि ऍड.ओकार बंडूपंत हिंगमिरे (वय 27) यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चालक आशुतोष विठ्ठल जाधव (वय 25) हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघे बोरगावहून भिलवडी स्टेशन येथे जात होते.

हजारवाडी येथील एचपी गॅस फॅक्टरीजवळ गाडी ओव्हरटेक करत असताना समोरून येणार्‍या दूध टॅकरला जोरदार धडक बसली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तासगाव येथील खासगी हजारवाडीच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. चालक आशुतोष विठ्ठल जाधव (वय 27 )यांची प्रकृती चिंताजनक असून तासगाव येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार चालू आहेत.

घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातातील मृत तरुण बोरगाव गावातील असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भवड यांनी आपघात स्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. आपघातानंतर बघ्याची मोठी गर्दी झाल्यामुळे वाहतुक ठप्प झाली. अधिक तपास भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करीत आहेत. या घटनेची फिर्याद संतोष विलास शेंडे यांनी भिलवडी पोलिसात दिली आहे.
रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *