sangli bjp news : मी 22 जागा त्यांना देणार असे कुठेच म्हटले नव्हते : चंद्रकांतदादा पाटील

SHARE:

sangli bjp news : मी 22 जागा त्यांना देणार असे कुठेच म्हटले नव्हते : चंद्रकांतदादा पाटील : सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत दादा यांच्या वक्तव्यावर आ. सुधीर गाडगीळ यांनी लेटर बॉम्ब टाकला आहे. त्यानंतर मी जयश्री पाटील गटाला 22 जागा देणार असे म्हटलेच नाही, असा पलटवार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.

sangli bjp news : मी 22 जागा त्यांना देणार असे कुठेच म्हटले नव्हते : चंद्रकांतदादा पाटील

पालकमंत्री पाटील म्हणाले, मी स्वतः आ. गाडगीळ यांच्याशी चर्चा केली आहे. मी असं कुठंही 22 जागा त्यांना देणार असल्याचे म्हटले नव्हते, त्याबाबत कुठलीही व्हिडीओ क्लिप काढून दाखवावी. जयश्रीताई पाटील यांचे म्हणणे असे होते, आमचे काँग्रेसचे 22 नगरसेवक होते. त्यानुसार आम्हांला 22 उमेदवारी द्या. जयश्रीवहिनींना असे म्हटले होते की तुमच्याबरोबर 6 नगरसेवक आले आहेत.

22 उमेदवार काय 24 पण देवू. पण एकदा आरक्षण पडू दे. सर्व्हेक्षण होवू दे. कुणाचे कुणाकडे स्ट्राँग उमेदवार आहेत ते कळू देत. कदाचित तुमचे सहाचे चारही पण करावे लागतील. 22 च्या 24 पण करता येतील. जयश्रीवहिनींना 22 जागा देणार असे मी कुठं म्हटलेले नाही. त्यांची अपेक्षा असणार आहे. त्याच चुकीचं काय आहे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार सुधीरदादा हे नाराज होणारे व्यक्तिमत्व नाही. ते सदा प्रसन्न असतात. त्यामुळे ते नाराज नाहीत. भाजपमध्ये नाराजी वैगेरे काही विषय नसतो. तर काही असले तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गेल्यानंतर पूर्ण संपते. त्यामुळे काही काळजी करु नका. जे देव पाण्यात ठेवून बसलेत. भाजपमध्ये भांडणं होवू देत, गट पडू देत. मग साधेल. महानगरपालिका, जिल्हा परिषद असो अथवा ईश्वरपूर नगरपरिषद असो. या सर्व ठिकाणी भाजप-महायुतीचीच सत्ता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ज्या वेगाने भाजप राजकारणात वाढत आहे. पहिल्या क्रमांकावर आमचा पक्ष पोहोचला आहे. ते लोकांना बघवत नाही. पुण्यातही भाजपमध्ये खोडा घालण्याचा प्रकार सुरु आहे, तसे सांगलीसारख्या ठिकाणी आमच्यामध्ये बिबा घालण्याचा प्रयत्न झाला. दादा असं म्हणतात, तसं म्हणतात. आ. गाडगीळांशी माझी सकाळी चर्चा झाली आहे. महानगरपालिकेबाबतची स्पष्टता दिली. भाजप नेते, कार्यकर्त्यांना सूचना दिली आहे, तुम्ही भांडू नका, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झाला आहे.

जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, अण्णासाहेब डांगे, वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र जिथं-जिथं भाजपच्या जागा आहेत, त्याठिकाणी हात लावणार नाही. महापालिकेत भाजपच्या दोन अपक्षासह 43 जागा आमच्याकडे आहेत. त्यामध्ये अ‍ॅडजस्टमेंट नाही. जे घटक पक्ष आहेत, तसेच जे बरोबर येताहेत, त्यांच्या असलेली संख्या त्यांना देवू. जे निवडून आले आहेत, ते त्यांच्यासोबत आहेत की नाहीत, ते त्यांनी ठरवायचे. अथवा आमचा सर्व्हे ठरवेल. आमची संख्या 43 आहे, जागा निश्चित आहेत. विद्यमान नगरसेवकांनाच उमेदवारी द्यायची की नाही, हे सर्व्हेवर ठरणार आहे.

महापालिकेचा पाच वर्षे आणि प्रशासनाचा तीन वर्षाचा कालावधी मिळून आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत विद्यमानासह काही नवीन लोकही तयार झाले आहेत. त्याचा सर्व्हे केला जाईल. आमचे 43 आणि जयश्रीताई पाटील यांचे 6 नगरसेवक असे 49 झाले. याशिवाय अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस नायकवडी आणि घटक पक्षाचे नगरसेवक आहेत, त्या त्यांना विचारु. त्या व्यतिरिक्त उरणार्‍या जागा आहेत, त्या कुणाला किती द्यायच्या, हे चर्चा करुन ठरवू.

नव्याने जनसुराज्य पक्ष कार्यरत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव आहे. तसेच आ. सुधीर गाडगीळ यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणतेही कार्यकर्ते आणि नेत्यांवर अन्याय होणार नसल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *