sangli bank news : सांगलीसह जिल्हा बँकांना नोकरभरतीसाठी तीन कंपन्यांची सक्ती : राज्यातील सर्व जिल्हा बॅकांमध्ये या पुढे नोकरभरती करताना 70 टक्के जागा बॅँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवाव्यात उर्वरीत 30 टक्के जागा अन्य जिल्ह्यातील उमेदवारांसाठी खुल्या असतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नोकरभरती आयबीपीएस, टीसीएस व एमकेसीएल या तीन कंपन्याखेरीच अन्य कोणत्याही कंपनीकडून करु नये, असे आदेश राज्य शासनाच्या सहकार विभागाने दिले आहेत.
sangli bank news : सांगलीसह जिल्हा बँकांना नोकरभरतीसाठी तीन कंपन्यांची सक्ती
जिल्हा बँकांत 70 टक्के भूमिपुत्रांना संधी, सहकार विभागाचे आदेश
राज्यातील विविध जिल्हा बॅकांमध्ये होणार्या नोकर भरतीबाबात राज्य शासनाच्या सहकार विभागाने 31 ऑक्टोंबर रोजी नवीन आदेश जारी केला आहे. सहकार विभागाचे अपर निबंधक तथा सह सचिव संतोष पाटील यांनी हा आदेश निर्गमीत केला आहे. यात म्हटले आहे, राज्यातील काही जिल्हा बॅँकांमध्ये सहकार आयुक्तांच्या स्तरावरील तालीकेमधील संस्थांची निवड करुन नोकर भरती सुरु आहे. मात्र अशा प्रकारे नोकर भरती प्रक्रियेतील काही संस्थांच्याबाबत संबधीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, उमेदवार, नागरीकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
सदर तक्रारींच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी शासनास जिल्हा बॅकांतील नोकर भरती आयबीपीएस, टीसीएस व एमकेसीएल या कंपन्यामार्फतच राबवण्यात यावी असा प्रस्ताव दिला होता तो शासनाने मान्य केला असून या तीन कंपन्यामार्फत राज्यातील सर्व जिल्हा बॅकांत नोकर भरती करावी असे आदेश शासनाने दिले आहे. तसेच यापुर्वी ज्या सहा कपंन्यांना मान्यता देण्यात आली होती. ती रद्द करण्यात आली असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
तसेच नोकर भरती करताना जिल्हा बॅकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी असेलेला उमेदवारांसाठी 70 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. उर्वरीत 30 टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी असतील मात्र असे उमेदवार न मिळाल्यास स्थानिक उमेदारांवर त्या जागांवर भरती करता येणार आहे. सदर आदेशापुर्वी ज्या जिल्हा बॅकांची नोकर भरतीची जाहीरात प्रसिध्द झाली आहे त्यानाही हा आदेश लागू होणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











