ashta news : आष्ट्यात नगराध्यक्ष विशाल शिंदे यांनी स्वीकारला पदभार

SHARE:

ashta news : आष्ट्यात नगराध्यक्ष विशाल शिंदे यांनी स्वीकारला पदभार : पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले आष्टा शहर विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विशाल विलासराव शिंदे यांनी सोमवारी दुपारी नगराध्यक्ष पदाचा पदभार आमदार जयंतराव पाटील व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला.

ashta news : आष्ट्यात नगराध्यक्ष विशाल शिंदे यांनी स्वीकारला पदभार

यावेळी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नूतन नगराध्यक्ष विशाल शिंदे यांच्यासह नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील जनतेने,युवकांनी, महिला भगिनींनी मताधिक्य देऊन आष्टा शहर विकास आघाडी प्रति दाखवलेला विश्वास सर्व नूतन नगरसेवक यांना बरोबर घेऊन विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू.

आ. जयंतराव पाटील, आघाडीचे नेते वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विकासकामे करणार असून आष्ट्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, झुंझारराव शिंदे, सौ. विद्याताई शिंदे, नगरसेवक दिलीप वग्याणी, विराज शिंदे, रवींद्र पाटील, सविता वारे, नंदकुमार बसुगडे, स्नेहा माळी, दत्तात्रेय मस्के, रंजना विरभक्त,
सचिन घस्ते, स्नेहल मिरजकर, मंगल सिद्ध, झुंझारराव पाटील, तेजश्री बोंडे, नातू मुजावर, संगीता आटुगडे, राजाराम पाटील, सारिका मदने, रागिनी सावंत, संगीता सूर्यवंशी, विजय मोरे, शहाणाबाई शेळके, सुहास अवघडे, लता खोत, माजी नगरसेवक धैर्यशील शिंदे, विश्वराज शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार जयंतराव पाटील व मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष विशालभाऊ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सौ. विद्याताई शिंदे, विश्वराज शिंदे यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *