sangli ncp news : राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या करगणी गटाचे सदस्य विनायक मासाळ आणि मणेराजुरी गटाचे सदस्य शशिकांत जमदाडे यांनी पक्षाचा व्हीप डावलून भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याने या दोघांवर पक्षविरोधी कार्यवाहीमळे त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी 1 एप्रिलला होणार आहेत. या निवडीमध्ये त्या दोन सदस्यांची काय भूमिका असणार यानंतरच कारवाईबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.
sangli ncp news : राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार
सभापती निवडीनंतर कारवाई होणार
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी 31 सदस्यांची आवश्यकता होती, मात्र महाविकास आघाडीने सर्वाधिक 30 जागा जिंकून काठावर पोहोचली. आघाडीला सत्तेसाठी केवळ एक जागेची गरज होती. भाजप महायुतीचे बलाबल पाहिले तर 31 होते मात्र जिल्हा परिषद निवडणूक महायुतीतील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेना स्वतंत्र लढली होती. त्यामुळे महायुतीत फूट पडली.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य असून आघाडीच्या बाजूने मतदान करण्याबाबत गटनेत्या राजेश्वरी नाईक यांनी काढला होता. राष्ट्रवादीच्या सहा सदस्यापैकी चार जणांनी व्हीप घेतला तर दोन जणांनी स्वीकारण्यास नकार दिला.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या करगणी गटातून निवडून आलेले विनायक मासाळ आणि मणेराजुरी गटाचे सदस्य शशिकांत जमदाडे यांनी पक्षाचा व्हीप डावलून भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. पक्षाचा व्हीप डावलून मासाळ आणि जमदाडे या दोन सदस्यांनी अध्यक्ष निवडीवेळी भाजपला तर उपाध्यक्ष निवडीवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. पक्षाचा व्हीप डावलून विरोधात जाऊन मतदान केल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षातील नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे.
विषय समिती सभापतींच्या निवडी 1 एप्रिलला होणार आहेत. या निवडीवेळी ते दोन सदस्य कोणती भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सभापती निवडीवेळीही त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











