raju shetti news : आंबा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 22 हजाराची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ राजू शेट्टी यांची टीका

SHARE:

raju shetti news : आंबा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 22 हजाराची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ राजू शेट्टी यांची टीका  राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 22 हजार रुपयांची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशीच आहे. ही तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळले असून, त्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.

raju shetti news : आंबा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 22 हजाराची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ राजू शेट्टी यांची टीका

एका हेक्टरवर आंबा बागेची मशागत, औषध फवारणी आणि खतांसाठी शेतकर्‍याला वर्षाकाठी किमान 4 ते 4.50 लाख रुपये प्रत्यक्षात खर्च येतो. अशा परिस्थितीत केवळ 22 हजार रुपये देऊन सरकार शेतकर्‍यांचे काय साध्य करू इच्छिते? कोकणातील हापूस आणि राज्यातील केसर आंबा उत्पादक जागतिक स्तरावर राज्याचे नाव उंचावत आहेत. मात्र, संकटकाळी त्यांना वार्‍यावर सोडण्याचे पाप हे सरकार करत आहे. ही मदत म्हणजे मदतीच्या नावाखाली केलेली क्रूर थट्टा आहे.

एकीकडे गरजेचा नसलेला शक्तीपीठ महामार्ग करण्यास दरिद्री फडणवीस सरकारकडे 1 लाख 15 हजार कोटी आहेत , मागील कुंभमेळा 2500 हजार कोटी रूपये खर्चून करण्यात आला होता मात्र यंदाच्या नाशिकच्या कुंभमेळ्याला 25 हजार कोटी खर्च करत आहेत. देवेंद्र फडणवीसपलीि; ही उधळपट्टी फक्त टक्केवारीसाठी करत आहेत. राज्यात 1 लाख 24 हजार हेक्टर आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र आंबा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 5 लाख रूपये प्रमाणे मदत करण्यासाठी 6 हजार कोटी रूपये सरकारकडे नाहीत ही कृषीप्रधान राज्याची शोकांतिका असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.

कोकणातील शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर उतरला असून ही मदत म्हणजे त्यांच्या संघर्षावर मीठ चोळल्यातील प्रकार झाल्याने लवकरच मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आंबा व काजू उत्पादक शेतकर्‍यांचा विराट मोर्चा काढणार असून येत्या दोन दिवसात या मोर्चाची तारीख जाहीर करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

अंबादर प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकताच कोकणामध्ये एक मोर्चा काढला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या समस्यांकडे सरकारने गंभीर लक्ष द्यावे, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. आंबा बागायतदारांना हेक्टरीस 5 लाख रुपये आणि काजू बागायतदारांना 3 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, तसेच इतर अनेक मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीआंबा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 22 हजाराची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ ; राजू शेट्टी यांची टीका

राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 22 हजार रुपयांची मदत म्हणजे ’उंटाच्या तोंडात जिरे’ अशीच आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा