daflapur news : डफळापुरात शेततळ्यात बुडून आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू : जत तालुक्यातील डफळापूर येथील भोसले मळ्यातील शेततळ्यात बुडून आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सुशिला विठाप्पा पडोळकर (वय 45) व अनिल विठाप्पा पडोळकर (वय 28, रा. अकोळ, ता. निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.
daflapur news : डफळापुरात शेततळ्यात बुडून आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू
पडोळकर कुटुंब शेतीसोबत मेंढपाळीचा व्यवसाय करत असून मेंढ्या चारण्यासाठी विविध ठिकाणी फिरतात . गेल्या महिनाभरापासून हे कुटुंब जत तालुक्यातील बाज, डफळापूर व अंकले परिसरात मुक्कामी होते. मंगळवारी डफळापूर येथील दिलीप भोसले यांच्या शेतात मेंढ्या थांबवण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी सुशिला पडोळकर पाणी आणण्यासाठी शेततळ्याकडे गेल्या असता त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी मुलगा अनिल याने तात्काळ तळ्यात उडी मारली;
मात्र दोघेही पाण्यात बुडाले. कुटुंबातील इतर सदस्यांनी मदतीचा प्रयत्न केला. मुलगी सुनिता हिला जावई हलाप्पा यांनी सुरक्षित बाहेर काढले, तर दुसरा मुलगा लकाप्पा याने अनिलला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले.
जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तपासानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











