sangli crime news : सांगलीत भरधाव टेम्पोच्या धडकेत कसबे डिग्रजचा दुचाकीस्वार ठार : सांगली शहरातील जुना बुधगाव रोडवरील एका हार्डवेअर दुकानासमोर भरधाव टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात प्रथमेश प्रकाश कांबळे (वय 23 रा. कसबे डिग्रज) हा तरुण ठार झाला. सदरचा अपघात हा बुधवार दि. 24 मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला.
sangli crime news : सांगलीत भरधाव टेम्पोच्या धडकेत कसबे डिग्रजचा दुचाकीस्वार ठार
या प्रकरणी प्रणव भाऊसो भिसे (वय 29 रा. कसबे डिग्रज ) याने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत प्रथमेश प्रकाश कांबळे हा आपल्या कुटुंबीयांसह मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज गावामध्ये राहत होता. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रथमेश हा फिर्यादी प्रणव भिसे याची मोटारसायकल (क्र. एमएच 09 बीएच 7640) वरुन हळद भवन ते ट्रक अड्डा जाणार्या रोडवरून भिसे याच्या हॉटेलकडे निघाला होता.
यावेळी जुना बुधगांव रोडवरील गीता पुरोहीत हार्डवेअर दुकाना समोर त्याची दुचाकी आली असता ईदगाह मैदानाकडुन सांगलीकडे येणा-या एका अनोळखी ट्रकटेम्पोवरील अनोळखी चालकने भरधाव वेगाने वाहन चालवुन प्रथमेश याच्या मोटार सायकलला जोराची धडक दिली. या अपघातात प्रथमेश कांबळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालकाने न थांबता निघून गेला.
या अपघातानंतर भिसे याने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला असून चालकाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











