chorochi murdar news : चोरोची नजिक रक्ताच्या थारोळ्यात सांगलीच्या व्यक्तीचा मृतदेह

SHARE:

chorochi murdar news : चोरोची नजिक रक्ताच्या थारोळ्यात सांगलीच्या व्यक्तीचा मृतदेह : गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नागज ते जत रस्त्यावर कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावानजीक नाल्यामध्पे अत्यंत निर्जन स्थळी 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. दत्तात्रय भगवान चाबरे (वय 45) रा.संजय नगर , सांगली असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डावरून पोलिसांना त्यांची ओळख पटवण्यात यश आले आहे.

chorochi murdar news : चोरोची नजिक रक्ताच्या थारोळ्यात सांगलीच्या व्यक्तीचा मृतदेह

मंगळवारी सकाळी आकरा वाजता पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली. काँक्रीटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रक्ताचे डाग पसरलेले दिसून आले आहेत. तसेच मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात फेकून दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा. असा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या समोर पोलिसांनी रीतसर पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले आहेत. हा अपघात आहे की घातपात हे केवळ वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *