kolhapur news : कोल्हापुरात कॉलेजमध्ये सोडायला वडील थांबले नाहीत, मुलाने उचलले टोकाचे पाऊल : दुचाकीवरून कॉलेजमध्ये सोडण्यासाठी वडील घरी थांबले नाहीत. या नैराश्यातून मुलाने राहत्या घरी छताच्या फॅनला वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. साईराज पांडुरंग हुंबे (वय 18, रा.आयडियल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. तो शहरातील एका महाविद्यालयात सिव्हिल डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकत होता.
kolhapur news : कोल्हापुरात कॉलेजमध्ये सोडायला वडील थांबले नाहीत, मुलाने उचलले टोकाचे पाऊल
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, माळी काम करणारे पांडुरंग हुंबे हे लक्षतीर्थ वसाहतीत कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा तीन नंबरचा मुलगा साईराज हा शहरातील एका महाविद्यालयात सिव्हिल डिप्लोमाच्या दुसर्या वर्षात शिकत होता.
सोमवारी सकाळी त्याला लवकर कॉलेजमध्ये जायचे होते. रविवारी रात्रीच त्याने दुचाकीवरून कॉलेजमध्ये सोडण्याची विनंती वडिलांना केली होती. मात्र, सोमवारी सकाळी तो लवकर उठला नाही. अखेर नऊच्या सुमारास वडील दुचाकी घेऊन कामासाठी घराबाहेर पडले.
त्यानंतर, उठलेल्या साईराजने वडिलांना फोन केला. मोठ्या भावालाही फोन केला. त्यानंतर, बेडरूमचा दरवाजा बंद करून त्याने छताच्या फॅनला वायरने गळफास घेतला. बराच वेळ तो खोलीतून बाहेर येत नसल्याने आणि आवाज देऊनही काही प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाइकांनी खोलीचा दरवाजा तोडून पाहिले असता, त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
तातडीने गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी केलेल्या चौकशीत वडिलांनी कॉलेजमध्ये न सोडल्याच्या नैराश्यातून मुलाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
किरकोळ कारणातून मुलाने केलेल्या आत्महत्येमुळे हुंबे कुटुंबीयांना धक्का बसला असून, लक्षतीर्थ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यापश्चात आई, वडील, मोठी बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










