maishal mews : म्हैसाळमध्ये डान्सबारवर छापा, पाच तरुणींसह 10 जणांवर कारवाई : राज्यात बंदी असतानाही कर्नाटक सीमालगत असलेल्या म्हैसाळमध्ये सुरू असलेल्या छमछमवर (डान्स बारवर) पोलीसांनी छापा टाकून 5 तरूणींसह 10 जणांविरूध्द कारवाई केली. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असली तरी कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे सांगण्यास पोलीसांकडून टाळाटाळ करण्यात आली.
maishal mews : म्हैसाळमध्ये डान्सबारवर छापा, पाच तरुणींसह 10 जणांवर कारवाई
म्हैसाळ (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या एका आलिशान बारमध्ये ग्राहकांना मद्यपुरवठा करण्यासाठी तरूणी असल्याचा आणि त्या ग्राहकासोबत नृत्यही करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विजयनगर रस्त्यावरील हॉटेल राही पॅलेस या बारवर काल रात्री पोलीसांनी छापा टाकला. यावेळी काही ग्राहक पलायनात यशस्वी झाले.
मात्र, 10 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. यामध्ये बार व्यवस्थापकासह चार तरूण आणि पाच तरूणींचा समावेश आर्हे. या दहा जणाविरूध्द मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी छापा टाकला त्यावेळी काही तरूण मद्य प्राशन करत असल्याचे आढळले, तर तरूणी मद्य प्राशन करणार्या ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी ध्वनीवर्धकावर लावण्यात आलेल्या गीतावर नृत्य करत असल्याचेही आढळल्याचे सांगण्यात आले.
मिरज शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू असून कॅसिनोमध्ये दिवसभर तरूण वर्गाचा राबता असतो. मात्र, यावर पोलीसांकडून कारवाई होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी उप अधिक्षक प्रणिल गिल्डा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










