kavthe piran new : कवठेपिरानमध्ये दारूच्या कारणातून तरुणाचा निर्घृण खून

SHARE:

kavthe piran new : कवठेपिरानमध्ये दारूच्या कारणातून तरुणाचा निर्घृण खून : मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये भरदुपारी तरुणाचा दारू पाजण्यावरून झालेल्या वादातून निर्घृण खून करण्यात आला. सदरची घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन सुभाष पाटील (वय 36) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनानंतर घराला कुलूप लावून पसार झालेल्या संशयित जगन्नाथ उर्फ सोन्या विलास भोसले (वय 40 रा. कवठेपिरान) याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन तासात गजाआड केले. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.

kavthe piran new : कवठेपिरानमध्ये दारूच्या कारणातून तरुणाचा निर्घृण खून

डोक्यात केले वार : संशयित हल्लेखोराला पाठलाग करून पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत सचिन पाटील हा मोलमजुरी करून कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये राहत होता. संशयित हल्लेखोर भोसले हा गावात राहण्यास आहे. त्याचे आई-वडिल शेतातील घरात राहण्यास आहेत.

संशयित भोसले याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी घर सोडून गेली होती. तो मोलमजूरीचे काम करतो. जगन्नाथ आणि सचिन हे दोघेजण मित्र आहेत. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जगन्नाथ उर्फ सोन्या आणि सचिन पाटील हे दोघेजण जगन्नाथ याच्या घरी दारू पीत बसले होते. यावेळी दोघांमध्ये तत्कालीन कारणावरून वाद झाला.

या वादातून जगन्नाथ याने अज्ञात हत्याराने डोक्यात निर्घृण वार करून त्याचा खून केला. रक्ताच्या थोराळ्यात पाटील पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित भोसले याने घराला कुलूप लावून पळ काढला. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक संदीप भागवत, पोलिस निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. याठिकाणी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले होते.

संशयित जगन्नाथ भोसले हा घटनेनंतर गावातील एकाची दुचाकी घेऊन निघाला. दुधगावसह परिसरातून तो निघाला. त्यानंतर अंबप (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानंतर पथकाने छापेमारी करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *