dcc bank news : तीन वर्षांनंतर पुन्हा होता येईल बँक संचालक, रिझर्व्ह बँकेची नवीन तरतूद

SHARE:

dcc bank news : तीन वर्षांनंतर पुन्हा होता येईल बँक संचालक, रिझर्व्ह बँकेची नवीन तरतूद : सहकारी बँकांच्या संचालकांना सलग दहा वर्षानंतर पुन्हा संचालक म्हणून काम करता येणार नाही, पण रिझर्व्ह बँकेने नियमावलीत थोडी शिथिलता दिली आहे. तीन वर्षाचा ‘कुलिंग कालावधी’ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याच किंवा इतर सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करता येणार आहे. यामुळे जिल्हा बँकेसह इतर नागरी सहकारी बँकांच्या बड्या संचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

dcc bank news : तीन वर्षांनंतर पुन्हा होता येईल बँक संचालक, रिझर्व्ह बँकेची नवीन तरतूद

जिल्हा बँकेच्या बड्या संचालकांना काहीसा दिलासा

सहकारी बँकांतील अपहाराचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे ठेवीदारांचे होत असलेले नुकसान पाहता, रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांबाबतचे धोरण कडक केले आहे. बहुतांशी बँकांमध्ये 20-25 वर्षे संचालक म्हणून तीच तीच व्यक्ती राहिल्याने अपहाराला वाव मिळतो. त्यामुळे एका व्यक्तीला जास्तीत जास्त दहा वर्षे संचालक म्हणून काम करता येईल. त्यानंतर तीन वर्ष त्यांना बँकेमध्ये पद धारण करता येणार नाही. केवळ बँकेचे सभासद म्हणून व्यवहार करता येतील. असे आदेश रिझर्व्ह बँकेने 2025 मध्ये काढले होते.

या निर्णयाला देशातील सहकारी बँकांनी विरोध केला होता, ‘कुलिंग कालावधी’ बाबत फेरविचार करण्याची विनंती रिझर्व्ह बँकेला केली होती. त्यानुसार नवीन तरतूद केली असून सलग संचालक म्हणून चा काळ हा दहा वर्षाचा आहे तसा ठेवलेला असून, केवळ त्यामध्ये अशा संचालकांना अशाप्रकारे तीन वर्षाचा ‘कुलिंग कालावधी’ संपल्यानंतर नव्याने पुन्हा बँकेत संचालक म्हणून काम करता येईल. अशाप्रसंगी एक तर त्यांना निवडणुकी मार्गे निवडून येऊन अथवा स्वीकृत संचालक म्हणून अथवा अन्य कोणतेही प्रकारे नव्याने पद धारण करता येईल.

खंडित कालावधीही तीन वर्षापेक्षा अधिक असावा

संचालक पदाचा दहा वर्षाचा कार्यकाळ मोजत असताना एखाद्या संचालकाचा कार्यकाळ मध्येच खंडित झाला असेल तर हा कालावधी तीन वर्षापेक्षा कमी असेल तर तो गृहित न धरता तो सलग मोजला जाईल. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ खंडित झाल्यानंतर पुन्हा निवडून आले असले तर त्यांचा कार्यकाळ सध्याचा आहे तेवढाच गृहीत धरला जाणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *