yelur news : येलुर फाटया नजीक कंटेनरची दुचाकीला धडक पत्नी ठार, पती जखमी

SHARE:

yelur news : येलुर फाटया नजीक कंटेनरची दुचाकीला धडक पत्नी ठार, पती जखमी : पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर येलुर फाटया नजीक असलेल्या धोकादायक वळण रस्त्यावर कंटेनरने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात कमल अप्पासाहेब फाळके (वय 51, रा.इटकरे, ता.वाळवा) या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती अप्पासाहेब रंगराव फाळके हे जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.

yelur news : येलुर फाटया नजीक कंटेनरची दुचाकीला धडक पत्नी ठार, पती जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान हा अपघात झाला. इटकरे ता.वाळवा येथील फाळके पती-पत्नी दुचाकी क्र. (एम.एच.10 ए.एफ.9321)वरून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. महामार्गावरील येलुर फाट्या जवळील पेट्रोल पंपासमोर त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी दोघेही रस्त्यावर पडले. अप्पासाहेब फाळके सुदैवाने रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. तर दुर्दैवाने कमल फाळके या रस्त्यावरच पडल्याने कंटेनरचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले. कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर अप्पासाहेब फाळके किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर महामार्गावरील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे खोळंबली होती. पती अप्पासाहेब रंगराव फाळके यांनी कुरळप पोलिसात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्परतेने वाहतुक सुरळीत केली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने आणि कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील तपास करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *