kolhapur crime news : जबाब देताना अडखळला अन् सापडला; सांत्वनासाठी आलेला पाहुणाच निघाला चोर : घरातील व्यक्ती मयत झाल्याच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन लक्ष्मीपुरीतील एका घरातून 18 लाख रुपये दागिन्याच्या चोरीचा गुन्हा दाखल होता. तपासात नातेवाइकांकडे चौकशी सुरू असताना एक जण विसंगत जबाब देत असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने 12 तोळे दागिने चोरल्याची कबुली दिली.
kolhapur crime news : जबाब देताना अडखळला अन् सापडला; सांत्वनासाठी आलेला पाहुणाच निघाला चोर
अशपाक खाजासाब साठी (वय 35 रा. खडी बाजार, कसाई गल्ली, शहापूर, जि. बेळगाव) असे चोरट्याचे नाव असून खाटीक यांचा नातेवाईक असल्याचे उघड झाले. त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रविवार पेठ, लक्ष्मीपुरी येथील इम्तियाज खाटीक यांच्या घरी 22 एप्रिलला नातेवाइकांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी मोठ्या संख्येने पाहुण्यांची गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेत सर्वांची नजर चुकवून तिसर्या मजल्यावरील तिजोरी फोडून चोरट्याने सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी तपास सुरू केला होता. नातेवाइकांचे जबाब घेण्यात आले. त्यावेळी मयत व्यक्तीच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेल्यांनी चोरी केल्याचा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी विधीसाठी आलेल्या सर्व पाहुणे आणि उपस्थितांची यादी तयार केली. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून चौकशी केली. या वेळी संशयित अशपाक हा सातत्याने जबाब बदलत होता. त्यावरून त्याच्यावर संशय अधिक बळावला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
त्याने चोरलेले सोने वितळून त्याचे लहान तुकडे केले होते. ते 12 तोळे वजनाचे तुकडे जप्त केले. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, उपनिरीक्षक मयुश्वरी खरात, अंमलदार गजानन परीट, प्रीतम मिठारी, शशिकांत डोंगरे, मंगेश माने, तानाजी दावणे, किशोर पवार, रोहित ठोंबरे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
चोरून नेलेले दागिने घेऊन अशपाक हा बेळगावला गेला. तेथे त्याने कारागीर मित्राकडे 18 लाख रुपयांचे सोने वितळविले. छोट्या-मोठ्या आकाराचे 17 सोन्याचे तुकडे (लगडी) तयार केले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी बेळगाव येथे त्या कारागिराच्या दुकानातून सोने जप्त केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










