kasbe digraj news : कसबे डिग्रज फाट्यावर ‘मॉर्निंग वॉक’वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

SHARE:

kasbe digraj news : कसबे डिग्रज फाट्यावर ‘मॉर्निंग वॉक’वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार :  सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील कसबे डिग्रज गावाच्या कमानीपासून काही अंतरावर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ठार झाला. गणपती बिराप्पा पांडेगावकर (वय 62, रा. कसबे डिग्रज) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

kasbe digraj news : कसबे डिग्रज फाट्यावर ‘मॉर्निंग वॉक’वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

सदरचा अपघात हा शुक्रवारी पहाटे सुमारे साडे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गणपती पांडेगावकर हे दररोज पहाटे फिरायला जातात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे ते फिरायला बाहेर पडले होते. सांगली ते पेठ महामार्गावर कसबे डिग्रज गावच्या कमानीपासून काही अंतरावरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ते उंचावर असलेल्या महामार्गावरून खाली पडले. त्यामुळे कोणाला हा प्रकार लक्षात आला नाही.

दरम्यान नेहमीप्रमाणे पांडेगावकर हे घरी वेळेत आले नाहीत. त्यामुळे नातेवाईक त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा नऊच्या सुमारास ते रस्त्याच्या खाली मृतावस्थेत पडल्याचे आढळले. त्यामुळे नातेवाईकांना धक्काच बसला. सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत ते ठार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात फुटेज मिळते काय? याचा शोध सुरू केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *