kolhapur accident news : नवे घर बांधले, मुंबईहून गावी आले, काळाने संपूर्ण कुटुंबालाच हिरावले; भरधाव टॅकने दाम्पत्यासह दोन मुलांना चिरडले

SHARE:

kolhapur accident news : नवे घर बांधले, मुंबईहून गावी आले, काळाने संपूर्ण कुटुंबालाच हिरावले; भरधाव टॅकने दाम्पत्यासह दोन मुलांना चिरडले : उत्तूर-निपाणी मार्गावरील मुमेवाडीनजीक भरधाव मालमोटारीने दुचाकीवरील कुटुंबालाच चिरडल्याने पती-पत्नीसह त्यांची दोन्ही मुले जागीच ठार झाली. दीपक दत्ताराम चांदे (वय 39), शोभा दीपक चांदे (35), जय दीपक चांदे (9) व पूर्वा दीपक चांदे (6, मूळ होन्याळी, ता. आजरा, सध्या रा. तुंगा, पवई, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

kolhapur accident news : नवे घर बांधले, मुंबईहून गावी आले, काळाने संपूर्ण कुटुंबालाच हिरावले; भरधाव टॅकने दाम्पत्यासह दोन मुलांना चिरडले

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नोकरीनिमित्त पवई येथे राहणारे दीपक चांदे हे पत्नी व मुलांसह दोन आठवड्यांपूर्वी गावी होन्याळीला आले होते. दरम्यान, त्यांनी गडहिंग्लज-आजरा परिसरातील नातेवाइकांच्या गाठीभेटी घेतल्या. शुक्रवारी पुन्हा ते मुंबईला जाणार होते.

गुरुवारी सायंकाळी होन्याळीहून दीपक हे पत्नी व मुलांसह गडहिंग्लज तालुक्यातील माद्याळ या सासुरवाडीला दुचाकीवरून (एमएच 09, ईवाय 9783) जात होते. पाऊस आल्यामुळे उत्तूर येथे थांबून पुन्हा गडहिंग्लजकडे निघाले होते.

दरम्यान, आजर्‍याकडे जाणार्‍या मालवाहू ट्रकने (एमएच 12, वायक्यू 1465) समोरून जोराची धडक देऊन त्यांच्या दुचाकीला फरफटत नेले. ट्रकखाली चिरडल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेला ट्रकचालक प्रेम रामदास चंद्र (24, रा. पुरेगाव तलवार, समृद्ध शिवरत्नगंज पिलोय, अमेठी, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा आजरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. गडहिंग्लज पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दीपक यांच्या पश्चात आई, दोन बहिणी, भावजय असा परिवार आहे.

बारावीपर्यंत शिकलेला दीपक खासगी कंपनीत नोकरीला होता. आई व कुटुंबीयांसह तो पवई येथेच राहत होता. अलीकडे भावाचे निधन झाल्यामुळे भावाच्या दोन लहान मुलांसह आईला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती. गेल्या वर्षी त्याने गावी होन्याळी येथे नवे घरही बांधले आहे. घरात विजेची जोडणी व गेटच्या रंगकामासाठी तो पत्नी व मुलांसह बुधवारी गावी आला होता. होन्याळीहून सासरवाडीकडे जाताना काळाने त्याच्यासह संपूर्ण कुटुंबालाच हिरावून नेल्याने कुटुंबाचा एकमेव आधार गेला.

दुचाकीच्या नंबरवरूनच मृतांच्या नातेवाइकांचा शोध

दीपक हे मेहुणे राजेंद्र यांच्या दुचाकीवरूनच पत्नी व मुलांना घेऊन माद्याळला येत होते. दुचाकीच्या नंबरवरूनच मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. त्यामुळे गडहिंग्लज परिसरातील ग्रामसेवकांसह माद्याळ व होन्याळी ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *