नियमाचे उल्लघंन करत 4 बेस व दोन टॉप अशा मोठ्या क्षमतेच्या डि.जे. सिस्टिमचा वापर केला होता.
*मिरज तालुक्यातील आरग येथे पाचव्या दिवशीचे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान नऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी नियमाचे उल्लघंन करत 4 बेस व दोन टॉप अशा मोठ्या क्षमतेच्या डि.जे. सिस्टिमचा वापर केला होता. यामुळे गावात प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदुषण झाले आहे. गणेशोत्सवातील नियमभंग भोवला त्यामुळे आरग येथील नऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर ध्वनी प्रदुषणाबाबत कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सव दरम्यान ध्वनी प्रदुषणाचे नियम पाळण्याचे व डी.जे.स्पीकर वापरताना एक बेस व एक टॉप या मर्यादेचे तंतोतंत पालन करण्याचे स्पष्ट आवाहन केले होते. मात्र या आवाहानाचे उल्लघंन करून मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण करणार्या मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचे हददीतील आरग ता. मिरज येथील 1) बिरदेव तरूण मंडळ, आरग अध्यक्ष विकास परशराम टाकळे रा. आरग ता. मिरज किंग 72 कराड, डी.जे. मालक रोहित जयवंत जमाले रा. कराड ता. कराड 2) सत्यप्रेमी गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष सचिन बाबासाो पाटील रा. आरग रुद्र ऑडिओ, डि.जे. मालक संतोष हरी नागठाणे रा.आरग 3) हिंदवी गणेशोत्सव मंडळ आरग, अध्यक्ष प्रतिक जीवनधर शेटटी रा.आरग डी.एस. प्लस साउंड मालक आदित्य दादासाो शेळके रा. बागणी ता. वाळवा 4) श्री गणेश मंडळ आरग- सर्जेराव पाटील रा. आरग अरमान डी.टी. साउंड- मालक राजू जैनुदिदन मुल्ला रा.पलूस ता. पलूस 5) नवज्योत गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष अभिषेक नुलके रा.आरग योध्दा साउंड सिस्टिम चेडग- मालक राहूल बाबासाहेच कणसे रा. बेडग ता. मिरज 6) रामचंद्र परसु वाहन रा. अर्गता. मिरज आर.डी.एक्स. साउंड सिस्टिम काके मालक अजित भिमराव रा. काके ता. पन्हाळा जि. कोल्हापूर 7) नवरत्न गणेशोत्सव मंडळ आरग, अध्यक्ष विश्वजीत देसाई रा.आरग ता. मिरज मोरया साउंड, मुंढे मालक संकेत महादेव एडके रा. मुंढे ता. कराड जि.सातारा. 8) सातारा- शितल महावीर शेटे रा.अर्गता. मिरज सुरज संजय कदम रा.खेडता. सातारा जि. सातारा 9) तरुण मित्र मंडळ आरग अध्यक्ष अक्षय दिलीप उपाध्ये रा.आरग ता. मिरज माऊली फलटण, साउंड सिस्टिम मालक आदिनाथ नामदेव जगताप रा. फलटण ता. फलटण या नऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व साउंड सिस्टिम यांचेवर पोलीसांकडून कारवाई केली आली आहे.*
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











