दुचाकीचालक गंभीर जखमी
येथील कोल्हापूर रस्त्यावरील मनाली गार्डन जवळ एसटी बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुपवाडचा तरुण ठार झाला. तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे.
अमोल रमेश हंकारे (वय 21, रा. हनुमान नगर, कुपवाड, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. तर अजित जाधव (रा. कुपवाड, ता. मिरज) हा तरुण जखमी झाला आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना काल सायंकाळी घडली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अजित जाधव व अमोल हंकारे हे दोघे दुचाकीवरून जयसिंगपूर येथून सांगलीच्या दिशेने जात होते. ते मनाली गार्डन जवळ आल्यावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेल्याने पाठीमागे बसलेला अमोल गंभीर जखमी झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर अजित हा जखमी झाला आहे. याप्रकरणी यश वळीवडे (वय 19, रा. जैनापूर, ता. शिरोळ) याने पोलीसांत तक्रार दिली आहे. अपघात प्रकरणी एसटी बस चालक संजय अशोक जाधव (रा. कवठेमहांकाळ, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पो.हे.कॉ. मुल्ला करत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











