kolhapur crime news : दुसरीकडे लग्न ठरलं, प्रियकराने प्रेयसीला थेट दरीत ढकललं; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

SHARE:

kolhapur crime news : दुसरीकडे लग्न ठरलं, प्रियकराने प्रेयसीला थेट दरीत ढकललं; कोल्हापुरातील धक्कादायक घटना : पुण्यातील सिया-चेतन प्रकरण ताजे असतानाच, आता कोल्हापूर जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीला खड्ड्यात ढकलून तिची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तरुणीचा दुसरीकडे विवाह ठरल्याच्या रागातून हा संतापजनक प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.

kolhapur crime news : दुसरीकडे लग्न ठरलं, प्रियकराने प्रेयसीला थेट दरीत ढकललं; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी श्रीपाद दिनकर वडर याला अटक केली असून, मृत तरुणीचे नाव तरन्नुम बशीर नाईक आहे. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी इथल्या अवधूत कॉलनीत एकमेकांच्या घरासमोर राहत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. तरन्नुम महागाव इथल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

विवाह ठरल्यामुळे निर्माण झालेला वाद

तरन्नुमचा विवाह कुटुंबीयांनी दुसर्‍या एका तरुणाशी निश्चित केला होता. ही बातमी समजताच तिने श्रीपादसोबतचे प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला आणि यापुढे नाते ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. एकतर्फी प्रेम, संशयाच्या भावनेतून श्रीपादने तरुणीला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

निर्जन ठिकाणी नेऊन संपवले

शुक्रवारी सकाळी साधारण अकराच्या सुमारास संशयित श्रीपादने तरन्नुमला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर तो तिला भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरातील एका खोल दरीच्या भागात घेऊन गेला. तिथे पोहोचल्यानंतर दोघांमध्ये लग्नावरून जोरदार वाद झाला. संतापलेल्या आरोपीने संधी साधून तिला त्या खोल दरीत ढकलून दिले.

गुन्हा लपवण्याचा बनाव

हत्येनंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तरन्नुम बेपत्ता झाल्याची बनावट कहाणी रचत तो थेट भुदरगड पोलीस ठाण्यात पोहोचला. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आल्यामुळे त्यांनी कसून चौकशी केली. पोलिसांसमोर आरोपीने तरन्नुमला दरीत ढकलल्याची कबुली दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *