bhose news : भोसेतील विद्यार्थ्याची जपान येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

SHARE:

bhose news : भोसेतील विद्यार्थ्याची जपान येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड : भोसे गावचा सुपुत्र आणि सांगली सिटी हायस्कूल चा विद्यार्थी राजवर्धन प्रदीप काळे या बाल वैज्ञानिकाची जपान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

bhose news : भोसेतील विद्यार्थ्याची जपान येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या इन्स्पायर अवार्ड स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व राजवर्धन काळे यांनी केले होते. त्याने या प्रदर्शनात जलमार्गावरील नाव आणि बोट यांच्या संरक्षणासाठी अप्रतिम अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना प्रदर्शनात अनेकांचे लक्ष वेधून घेतली. राजवर्धन काळे हा लक्ष्मीवाडी तालुका मिरज या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी होता. दिल्ली येथे पार पडलेल्या प्रदर्शनात देशभरातून आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी राजवर्धन काळे हा प्राथमिक शाळेचा एकमेव विद्यार्थी होता.

या स्पर्धेतून देशभरातील 60 विद्यार्थ्यांची जपान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय बालवैज्ञानिक स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यामध्ये राजवर्धन काळेचाही समावेश आहे राजवर्धन काळे याने यापूर्वीही तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत ही आपली नवीन वैज्ञानिक संकल्पना सादर करून बक्षीसे पटकाविली आहेत

त्याच्या या निवडीने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यास पालक प्राथमिक शिक्षक प्रदीप काळे लक्ष्मीवाडी शाळेचे शिक्षक सुनील गावडे तसेच सांगली सिटी हायस्कूलचे शिक्षक सुनील गावडे मुख्याध्यापक रंगराव पाटील आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *