ashta election news : आष्टेकरांनी दिले नवे पालकत्व : वैभव -विशाल शिंदे

SHARE:

ashta election news : आष्टेकरांनी दिले नवे पालकत्व : वैभव -विशाल शिंदे : वाळवा तालुक्यातील आष्टा नगरपालिकेची निवडणूक अखेर पार पडली आणि या निवडणुकीने आष्ट्याच्या राजकीय इतिहासात एक भावनिक, निर्णायक व ऐतिहासिक पर्व नोंदवले. स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या छत्रछायेखाली घडलेले हे शहर, त्यांच्या पश्चात पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामुळे ही निवडणूक केवळ सत्तेची नव्हे, तर विश्वासाची, वारशाची आणि नेतृत्वाच्या कसोटीची होती.

ashta election news : आष्टेकरांनी दिले नवे पालकत्व : वैभव -विशाल शिंदे

विलासराव शिंदे यांचे सुपुत्र वैभव शिंदे आणि विशाल शिंदे या दोन्ही बंधूंनी आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आष्टा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून रणशिंग फुंकले. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर विरोधकांनी शिंदे घराण्याचा वारसा संपल्याची वल्गना केली, आष्टा आता कोणाची राहिली नाही, शिंदेंचे काहीच उरले नाही अशा घोषणा दिल्या. मात्र आष्टेकरांनी या सार्‍या वल्गनांना मतपेटीतून सडेतोड उत्तर दिले.

निकाल लागले आणि चित्र स्पष्ट झाले-

ही निवडणूक एकतर्फी नव्हे, तर अक्षरशः एकहाती सत्ता देणारी ठरली. 24 जागांपैकी तब्बल 23 जागांवर शिंदे बंधू आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणुकीत प्रा. विशाल शिंदे यांनी विरोधी उमेदवार प्रविण माने यांच्यावर 2753 मतांनी घवघवीत विजय मिळवून आपले नेतृत्व सिद्ध केले.

हा विजय केवळ आकड्यांचा नव्हता, तर भावनांचा होता. विलासराव शिंदे यांच्या पश्चात झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने तिचे महत्व प्रचंड होते. आष्टेकरांच्या मनात प्रश्न होता- आमचा मार्गदर्शक गेला, आता आमचा तारणहार कोण? आणि या प्रश्नाचे उत्तर आष्टेकरांनी स्वतःच दिले- वैभव शिंदे आणि विशाल शिंदे.

विरोधकांनी आरोपांची रास लावली, टीकेची धार वाढवली, पण शिंदे बंधू डगमगले नाहीत. कारण त्यांना ठाऊक होते- आष्टेकरांचे प्रेम, निष्ठा आणि विश्वास विलासराव शिंदे घराण्यावर किती खोलवर रुजलेला आहे. त्या विश्वासाचीच ही पावती होती.
आज पुन्हा एकदा हे समीकरण ठामपणे सिद्ध झाले-

आष्टा म्हणजे विलासराव शिंदे आणि विलासराव शिंदे म्हणजे आष्टा!

फरक इतकाच, की आता त्या वारशाला वैभव शिंदे आणि विशाल शिंदे यांचे नवे नेतृत्व लाभले आहे.
एकंदरीत, या निवडणुकीत आष्टेकरांनी शिंदे बंधूंवर केवळ सत्ता नाही, तर आपले पालकत्व, आपला विश्वास आणि आपले भविष्य सोपवले आहे. ही निवडणूक म्हणजे विजय नव्हे- हा आष्टेकरांनी दिलेला प्रेमाचा, विश्वासाचा आणि नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा कौल आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *