sangli spot : भाळवणीत फटाक्याच्या कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट; आवाजाने 4-5 किमी परिसर हादरला

SHARE:

sangli spot : भाळवणीत फटाक्याच्या कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट; आवाजाने 4-5 किमी परिसर हादरला: शोभेच्या दारू निर्मिती करणार्‍या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात दोघेजण गंभीर जखमी झाले. या स्फोटाने चार ते पाच कि.मी.चा परिसर हादरला असून कारखान्याचे शेड सुमारे चारशे फूट दूर फेकले गेले आहे. आफताब मन्सुर मुल्ला (वय 30, रा. भाळवणी) व अमीर उमर मुलाणी (वय 40, रा. चिंचणी-अं., ता. कडेगाव) असे या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना भाळवणी (ता. खानापूर, जि. सांगली) येथे सोमवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

sangli spot : भाळवणीत फटाक्याच्या कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट; आवाजाने 4-5 किमी परिसर हादरला

भाळवणी येथील मन्सूर मुल्ला यांचा बसस्थानकाच्याजवळ शोभेची दारू फटाका निर्मिती करण्याचा कारखाना आहे. येथील पत्र्याच्या एका शेडमध्ये शोभेचे फटाके तयार केले जातात. सोमवारी सकाळी या कारखान्यात त्यांचा मुलगा अफताब मुल्ला व नातेवाईक अमीर मुलाणी हे दोघेजण स्फोटकाची दारू कुटण्याचे काम करीत होते.

त्यावेळी दारूने अचानक पेट घेतला. त्यामुळे तेथे असलेल्या दारू साठ्याचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, पत्र्याचे शेड तीनशे ते चारशे फूट उडून बाजूला फेकले गेले. तर या स्फोटाचा आवाज चार ते पाच कि. मी. पर्यंत पोहचला. तसेच भाळवणी गावातील कारखान्याच्या शेजारी असलेल्या घरांच्या तसेच काही मोटारींच्या काचांनाही तडे गेले आहेत.

या स्फोटात अफताब मुल्ला व अमीर मुलाणी हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच विटा अग्निशमन तसेच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमी दोघांना तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांचीही प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने खानापूर तालुका हादरून गेला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *