cita election news : आमदार सुहासभैय्यांचा मास्टरस्ट्रोक

SHARE:

पुन्हा एकदा विटेकरांनी दिली शिवसेनेला साथ ; विटा पालिकेत शिवसेना आली सत्तास्थानी

cita election news : आमदार सुहासभैय्यांचा मास्टरस्ट्रोक : राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाला विटेकरांची भक्कम साथ मिळाली. यावेळी विटा नगरपालिकेत ऐतिहासिक सत्तांतर घडवून राजकीय सीमोल्लंघन करत एक नवा इतिहास घडवला.

cita election news : आमदार सुहासभैय्यांचा मास्टरस्ट्रोक

विधानसभेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत विधानसभा गाठलेल्या आमदार सुहास बाबर यांनी नुकतीच विजयाची वर्षपूर्ती साजरी केली. स्वतः विधानसभा गाठली, आता कार्यकर्त्यांना विटा नगरपालिकेत सत्ता आणण्याची आमदार सुहास बाबर यांच्यासमोर खरी कसोटी’ होती. मात्र वर्षभरात मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या भरवशावर आमदार सुहास बाबर यांनी विटा नगरपालिकेत सत्तांतर घडविण्याचे अग्निदिव्य पार करत आपला पॉलिटिकल परफॉर्मन्स सिद्ध केला आहे.

गेल्या वेळच्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 22 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला फक्त 2 जागा जिंकण्यात यश आले होते. सध्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे खानापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे. मात्र विटा नगरपालिका हा माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणारा पाटील गटाचा बालेकिल्ला भेदणे विरोधकांसाठी सोपी गोष्ट नव्हती. मात्र आमदार सुहास बाबर आणि त्यांचे जेष्ठ बंधू जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणे गनिमी काव्याने ही निवडणूक अत्यंत गोपनीयतेने लढवली.

दिवसागणिक बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे विटा पालिकेच्या निवडणुकीला प्रचंड महत्त्व आले होते. माजी नगरसेवक महेश कदम, युवा नेते भालचंद्र कांबळे, युवा नेते ड. धर्मेश पाटील, रोहित पाटील, माजी नगरसेवक सीताराम बुचडे,

संजय तारळेकर, विशाल तारळेकर, निलेश दिवटे असे विटयाच्या राजकारणातील दिग्गज पूर्वाश्रमीचे मोहरे आमदार सुहासभैय्यांसोबत आल्याने पालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागेल, अशी आशा बाबर समर्थकांना होती. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सुरेश खाडे, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या सभा झाल्या. तर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. मात्र विटयातील जनतेने तब्बल 3 हजार 194 मतांचे मताधिक्य देत शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान सौ. काजल म्हेत्रे यांना देत 2025 च्या निवडणूकीत एक नवा इतिहास घडविला.

विटा नगरपालिकेवर सलग 55 वर्षे माजी आमदार ड. सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटील गटाची सत्ता आहे. परंतु, यंदाच्या झालेल्या विटा नगरपालिकेच्या तिरंगी चुरशीच्या निवडणूकीमुळे पाटील गट नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार की ? बाबर गट विधानसभेप्रमाणे विटा पालिकेचेही रण जिंकणार ? याकडे विटेकरांचे लक्ष लागले होते. तर हायव्होल्टेज लढतीमुळे विटा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे विटा पालिकेची समीकरणे बदलली होती. विटा पालिकेच्या निवडणुकीत चुरस वाढलेली होती. यापूर्वी पाटील गट कायमच पालिकेची निवडणुक ही जनता आघाडीवर निवडणुका लढवल्या होत्या. विटा पालिकेत पाटील गट पहिल्यांदाच विटा पालिकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवित होता. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पश्चात होत असलेली विटा नगरपालिकेची निवडणूक पहिलीच होती.

त्यामुळे बाबर गटाची धुरा आमदार सुहास बाबर यांच्यावर होती. त्यामुळे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभा निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर गनिमी काव्याने व्युहरचना आखत जेष्ठ बंधू अमोल बाबर यांच्या साथीने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर विटा पालिकेची निवडणूक ताकदीने लढवली. त्यामुळे विटा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पाटील आणि बाबर गटात राजकीय अस्तित्वाची लढाई झाली.

विटा पालिकेची निवडणूक यावेळी भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात चुरशीने झाली. भाजपचे नेतृत्व माजी आमदार ड. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष ड. वैभव पाटील, मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड यांनी, तर शिंदेसेनेचे नेतृत्व आमदार सुहास बाबर व त्यांचे ज्येष्ठ बंधू अमोल बाबर यांनी केले होते. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादा गटानेही नगराध्यक्ष पदासह 7 उमेदवार मैदानात उतरविले होते.

परंतु, खरी लढत भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यातच चुरशीने झाल्याचे निकालात स्पष्ट झाले. पाटील गटाचे सर्वेसर्वा माजी आमदार ड. सदाशिवराव पाटील यांचे धुरंधर नेतृत्व सरस ठरणार की शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचा गनिमी कावा यशस्वी ठरणार ? याचीच सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र ही उत्सुकता आज लागलेल्या निकालामुळे संपुष्टात आली. या निवडणुकीत माजी आमदार अँड सदाशिवराव पाटील आणि आमदार सुहास बाबर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

निवडणूक कोण जिंकणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विटा नगरपालिकेच्या आखाड्यात भाजप की शिवसेना बाजी मारणार ? याचीच जोरदार चर्चा सुरू होती. निकालाचा कौल कुणाच्या बाजूने राहील ? याचा अंदाज बांधला जात होता. मात्र शिगेला पोहचलेली ही उत्सुकता आजच्या धक्कादायक निकालाने संपुष्टात आली. विटा पालिकेत अवघे 2 नगरसेवक संख्याबळ असणार्‍या शिवसेनेने धक्का देत नगराध्यक्ष पदासह 22 नगरसेवक निर्विवाद मोठ्या मताधिक्याने निवडून आणत विटा पालिकेवर शिवसेनेच्या विजयाचा भगवा फडकवला.
शिवसेनेच्या या विजयात आमदार सुहास बाबर, नवनिर्वाचित नगरसेवक अमोल बाबर यांच्याबरोबरीनेच बाबर गटाचे निष्ठावंत समर्थक आणि आणि पडद्यामागील अनेक ज्ञात अज्ञात हितचिंतक यांचे योगदान आहे.

2011 च्या नगरपालिका निवडणुकीपासून विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा विजयाचा झेंडा फडकवण्याचे दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे स्वप्न होते. ते स्वप्न आज सत्यात उतरले होते. मात्र आज विटा नगरपालिकेवर विजयाचा झेंडा फडकला असताना आमदार अनिलभाऊ बाबर हयात नाहीत, हा ऐतिहासिक क्षण विटा नगरपालिकेचे इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. एकंदरीत आमदार सुहास बाबर यांनी आपले नेतृत्व विटा नगरपालिकेच्या राजकारणात एक नवा इतिहास घडवून सिद्ध केले आहे. आमदार

सुहासभैय्यांचा गनिमी कावा यशस्वी ठरला असून तो राजकीय पटलावर चर्चेत आला आहे. पाटील गटाच्या 55 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत बाबर पॅटर्नचा नवा डाव विटा नगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय केला आहे.

विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला, ही बाब नोंद घेण्यासारखी आहे. ऐतिहासिक सत्तांतर घडवणारे आमदार सुहास बाबर हे पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार ठरले आहेत. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासात सांगली जिल्ह्यात शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेली विटा नगरपालिका ही जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका ठरली आहे. त्यामुळे आमदार सुहास बाबर यांचे राजकीय पटलावर पॉलिटिकल पॉवर वाढली आहे. आमदार सुहासभैय्याचा पॉलिटिकल मास्टरस्ट्रोक शिवसेनेला विटा पालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयापर्यंत घेऊन गेला

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *