डॉ. रवींद्र आरळींचा २४९६ मतांनी दणदणीत विजय; अकरा जागांसह भाजप सत्तेत, अपक्षाच्या पाठिंब्याने सत्ता स्थिर
jat election news ; जत नगरपालिकेवर भाजपाचा भगवा : जत नगर पालिकेच्या तिसऱ्या पंचवार्षीक आणि दुसऱ्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने एकहाती सत्ता काबीज करत दणदणीत विजय संपादन केला. येथे डॉ. रवींद्र आरळी यांनी काँग्रेसच्या सुजयनाना शिंदे यांचा तब्बल २४९६ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या सुरेशराव शिंदे यांना मतदारांनी तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. पालिकेत अकरा जागेवर भाजपने यश संपादीत केले.
jat election news ; जत नगरपालिकेवर भाजपाचा भगवा
तत्कालीन ग्रामपंचायत व नगर पालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपाने जत शहर काबीज केले आहे. या ऐतिहासीक विजयानंतर जत शहरात भाजपने मोठा विजयोत्सव साजरा केला. दरम्यान, मतदारांनी अनेकांचा अंदाज धुळीस मिळवत जत पालिकेत भाजपला अकरा, काँग्रेसला आठ, राष्ट्रवदी ए.पी. गट तीन तर एक अपक्ष असा कौल दिला आहे.
निवडणूक संपली, एकोप्याने विकास करू : आ. पडळकर
या विजयानंतर बोलताना आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, जतच्या जनतेनी विकासाला साथ दिली आहे. आम्ही निवडणुकीत ब्ल्यु प्रिंट जनतेसमोर ठेवली होती, ती लोकांना भावली आहे. जनतेने प्रथमच इतकं मोठं यश भाजपला दिले आहे. निवडणुकीत दिलेले प्रत्येक वचन पाच वर्षात पूर्ण करू. तसेच आजपासून विरोधाचे राजकारण संपले. विरोधी विजयी उमेदवारांनीही शहराच्या विकासासाठी एकोप्याने काम करण्यास साथ दयावी, असे आवाहन केले.
जनतेचा कौल मान्य, पुन्हा नेटाने काम करू : माजी आ.विक्रम सावंत
काँग्रेस नेते विक्रम सावंत म्हणाले, या निवडणुकीत आम्ही लोकांना हवे असणारे उमेदवार दिले होते. अतिशय चांगले वातावरण असतानाही आघाडीतील मत विभागणीचा फटका आंम्हाला बसला. शहराच्या विकासासाठी आमचे सदस्य नेटानें काम करतील. पालिकेत चांगल्या कामांना साथ देवू पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणार नाही. या पराभवाचे आत्मचिंतन देखील करणार आहोत.
जतचे नवे पक्षीय बलाबल
जत पालिकेसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे सेना अशी चौरंगी लढत होती. येथे भाजपने नगराध्यक्षासह अकरा जागा कमवल्या आहेत. तर काँग्रेसला आठ आणि राष्ट्रवादी ए. पी. गटाला तीन जागा मिळाल्या आहेत. विशेषता सत्ता स्थापनेला तेरा जागांची गरज आहे. परंतु अपक्ष विजयी उमेदवार फिरोज नदाफ यांनी भाजपला पाठींबा दिल्याचे आ. गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
चिठ्ठीतून अपक्ष उमेदवार निवडून आला
प्रभाग क्रमांक १० मध्ये अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ आणि भाजप उमेदवार पवन कुंभार यांना समान मते मिळाल्याने प्रथम फेरमोजणी घेण्यात आली. मात्र फेरमोजणीतही दोघांना समान मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणूक निर्णयासाठी चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर चिठ्ठीतून अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांची निवड झाली.
डॉ. रवींद्र आरळी (भाजप)- ९११२विजयी
सुजय शिंदे ( काँग्रेस)- ६६१६
सुरेश शिंदे (राष्ट्रवादी)- ३४७०
सलीम गवंडी (शिवसेना)- ८६४
मार्कसिस्टकडून अर्जुन कुकडे – ११४
नवनाथ पवार (अपक्ष)- १०६
मल्लिकार्जुन हत्ती (अपक्ष)- ६८
नोटा- ११४
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











