ashta election news : आष्टा येथील घरकुल योजना ; स्वप्नांना घर देणारी चळवळ : आष्टा येथील घरकुल योजना फक्त विटा-सिमेंटची नव्हे, तर शेकडो कुटुंबांच्या स्वप्नांची, आशेची आणि नवजीवनाची कहाणी आहे. आष्टा शहराच्या दृष्टीने एकेकाळी अशक्य वाटणारी ही महत्त्वाकांक्षी योजना सन 2006 ला प्रकाशात आली, आणि त्या दिवसापासून हजारो कुटुंबांचे आयुष्य नव्या दिशेने वळले.
ashta election news : आष्टा येथील घरकुल योजना ; स्वप्नांना घर देणारी चळवळ
मा. आमदार विलासराव शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून 2006 साली तब्बल 1356 घरकुल पहिली मान्यता मिळाली.
आजही अभिमानाने मिरवणाऱ्या या सोसायट्यांची उभारणी—
- काकासो शिंदे हाऊसिंग सोसायटी 175,
- विलासराव शिंदे हाऊसिंग सोसायटी 251,
- गौतम हाऊसिंग 398,
- उमाजी नाईक हाऊसिंग 90,
- जयंता बेरड सोसायटी 51,
- महात्मा गांधी सोसायटी 59,
- अहिल्यादेवी सोसायटी 66
…तर नंदवाले समाज हाऊसिंग सोसायटी 23 या सर्व सोसायट्या म्हणजे गरीबांच्या आश्रयाचे सुरक्षित किल्ले!
प्रत्येक घरकुलाला २५,००० रुपये शासनाची सबसिडी, तर रस्ते, गटारी, पाणी, शौचालये यांसारख्या मूलभूत कामांसाठी १५ कोटी १९ लाखांचे प्रचंड बजेट जणू आष्टा शहरात विकासाची नवसंजीवनी ठरले.

५०,००० पैकी ४३,००० घरकुलांची पूर्तता—एक नवा इतिहास!
महाराष्ट्रात मंजूर झालेल्या ५०,००० घटकुलांपैकी तब्बल ४३,००० घरकुल पूर्ण झाली—
यामध्ये आष्टा नगरपरिषद अग्रस्थानी राहिली.
सन १९९५ पासून प्रामाणिक काम करण्याची परंपरा जपणारी आष्टा नगरपरिषद आजही राज्यातील उत्कृष्ट नगरपरिषदांपैकी एक म्हणून गणली जाते.
समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय…
जून २०११ मध्ये मंजूर झालेल्या ५० घरकुलांच्या पुढील टप्प्यात—
मुस्लीम समाज, कोल्हाटी समाज, संतसेना समाज, उमाजी नाईक व जयंत बेघर सोसायटी कुटुंबांना घरकुल देण्यात आले.
रस्ते, गटारे, पाणीपुरवठा—सगळे काम ९ कोटी २३ लाखांच्या प्रकल्पातून पूर्ण झाले.
हे फक्त बांधकाम नव्हते…
हे होते समाजकल्याण, समानता आणि न्यायाच्या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार देण्याचे धाडस.
राज्य शासनाची प्रतिष्ठा वाढवणारा प्रकल्प…
स्मार्ट घरकूल योजनेअंतर्गत आष्टा शहराचे काम इतके उत्तम झाले की,
मुंबई व दिल्लीतील अधिकारीदेखील ‘आष्टा मॉडेल’चे कौतुक करू लागले.
निवडणुकीच्या राजकारणापलीकडे जाऊन, हा प्रकल्प झाला आष्ट्याच्या विकासाचा शिलालेख!
आणि आता… या प्रवासात एक नवा चेहरा! — विशाल शिंदे
आज या सर्व विकासकथेला नवी ऊर्जा देण्यासाठी, नवी दृष्टी देण्यासाठी पुढे आले आहेत—
विशाल शिंदे
ज्यांच्या विचारांत विलासराव शिंदे यांची विकासपरंपरा,
आणि कृतीत युवाशक्तीची धडाडी आहे.
घरकूलातला प्रत्येक दिवा, प्रत्येक कुटुंबाचा आनंद, प्रत्येक स्मित—
या शहराच्या उज्ज्वल उद्यासाठी विशाल शिंदे यांना नवा आत्मविश्वास देणारा आहे.
आष्ट्याचा विकास थांबलेला नाही…
तो फक्त पुढच्या पायरीवर चढण्यास तयार आहे—
आणि त्या पायरीवर आपले नेतृत्व करायला आज विशाल शिंदे सज्ज आहेत!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.







५०,००० पैकी ४३,००० घरकुलांची पूर्तता—एक नवा इतिहास!
समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय…
राज्य शासनाची प्रतिष्ठा वाढवणारा प्रकल्प…
आणि आता… या प्रवासात एक नवा चेहरा! — विशाल शिंदे




