smriti mandhana news : स्मृती मानधनाचा होणारा नवरा मुंबईला रवाना, टीम इंडियाही परतली, पलाश मुच्छलचे कुटुंबीय सांगलीतून निघाले : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा विवाहसोहळा 23 नोव्हेंबर रोजी पलाश मुच्छलसोबत पार पडणार होता. तीन दिवसांपासून तयारी जोरात सुरू होती, मंडप सजला होता, पाहुण्यांचे आगमन सुरू झाले होते. पण लग्नाच्या दिवशी धक्कादायक घटनेने सगळं वातावरण बदलून गेलं.
smriti mandhana news : स्मृती मानधनाचा होणारा नवरा मुंबईला रवाना, टीम इंडियाही परतली, पलाश मुच्छलचे कुटुंबीय सांगलीतून निघाले
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही घटना कुटुंबीयांसाठी मोठा धक्का ठरली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून कुटुंबीयांनी लग्न पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतला.
स्मृती मानधनाचा होणारा नवरा मुंबईला रवाना
लग्न पुढे ढकलल्यानंतर मुच्छल कुटुंबियांची हालचाल वाढलेली दिसून आली आहे. पलाश मुच्छल सांगलीतून काल उशिरा रात्री मुंबईला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याची बहीण, प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल आणि कुटुंबीयही सांगलीतून निघाले आहेत. लग्नासाठी तीन दिवसांपासून सांगलीत मुक्काम ठोकून असलेली भारतीय महिला क्रिकेट टीमही आज सकाळी विशेष वाहनाने मुंबईकडे रवाना झाली.
स्मृती मानधनाच्या या अचानक घडलेल्या कौटुंबिक संकटामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व आणि चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे. सर्व जण श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करत आहेत.
स्मृतीने सोशल मीडियावरून हटवले लग्न-संबंधित पोस्ट
स्मृतीने इंस्टाग्रामवरून तिच्या लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकले आहेत. हा निर्णय पाहून तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. स्मृतीने ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील समझो हो ही गया या गाण्यावर आधारित एक मजेशीर रील पोस्ट करत लग्नाची माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डीही तिच्यासोबत दिसत होत्या. मात्र आता हा व्हिडिओ तिच्या अकाउंटवर दिसत नाही, तिने डिलीट केला की हाइड, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










