ashta election news : ज्यांनी ईश्वरपूर भकास केले ते आष्ट्याच्या विकास काय करणार? : आ. जयंत पाटील : आष्ट्यात नेते मंडळींना घेऊन येऊन आष्ट्याच्या विकास करणार म्हणणार्यांनी ईश्वरपूरच काय केलं, ज्यांनी ईश्वरपूर भकास केले ते आष्ट्याच्या विकास काय करणार? असा सवाल आ. जयंत पाटील यांनी निशिकांत भोसले पाटील यांचे नाव न घेता केला.
ashta election news : ज्यांनी ईश्वरपूर भकास केले ते आष्ट्याच्या विकास काय करणार? : आ. जयंत पाटील
आष्टा येथील विविध ठिकाणी आयोजित आष्टा शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या कॉर्नर संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे, नगरसेवक पदाचे उमेदवार नंदकुमार बसुगडे, स्नेहा माळी, राजाराम पाटील, सारिका मदने, रवींद्र पाटील व सविता वारे, अंकुश मदने, जगन्नाथ बसुगडे, सतीश माळी, संदीप तांबवेकर, दिनकर बसुगडे, राम बसुगडे, श्रीकांत सावंत, राजाराम देसावळे, राजाराम मोहिते, ईसामुद्दीन मुल्ला, उषा विरभक्त, झीनत अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.जयंत पाटील म्हणाले, या शहराच्या लेकी, आया, बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. आपला मुलगा व्यसनाधीन होता कामा नये, सुसंस्कृत आष्टा शहराची संस्कृती बिघडू दिली नसली पाहिजे. आमचा उमेदवार योग्य आहे. सुसंस्कृत आहे. प्रत्येक वर्षाला पालिकेचे बजेट होण्यापूर्वी प्रभागात स्थानिक नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, अभियंता यांना घेऊन आमसभा होईल नागरिक सुचवतील त्याप्रमाणे संवादातून विकास कामे होतील.
वैभव शिंदे म्हणाले, या भागासह अष्टलिंग देवस्थानांच्या विकास स्व. विलासराव शिंदे यांनी केला. रांगोळी काढून नारळ फोडणार्यांना श्रेयवाद लाटू पाहणार्यांना जनता घरचा रस्ता दाखवेल. विरोधक येथे मंत्र्यांना घेऊन सभेत जाहीरपणे सांगतात नगरीचा विकास विलासराव शिंदे यांनी केला. मग खोट्या वलग्ना करून विरोधाभास का करता? सुरक्षित, सुसंस्कृत, शांतताप्रिय आष्टा नगरीसाठी आष्टा शहर विकास आघाडीला निवडून द्या.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











