ashta election news : आष्ट्यात नगराध्यक्ष भाजपचाच : सम्राट महाडिक : आष्टा नगरपरिषदेत नगराध्यक्ष भाजपचाच असेल. मित्रपक्ष आमच्या सोबत एकजुटीने असून, मित्रपक्षांच्या मदतीने निवडणुकीत ताकदीने उतरणार आहोत. महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहोत. घटक पक्षातील कोण बाजूला जाणार नाहीत. त्यांच्याशी चर्चा करून ते आमच्या सोबत कसे राहतील यासाठी प्रयत्न करणार आहोत.
ashta election news : आष्ट्यात नगराध्यक्ष भाजपचाच : सम्राट महाडिक
आ.सुरेश खाडे यांच्या पालकमंत्री कार्यकाळात आष्टा शहरात भाजपच्या माध्यमातून कोट्यवधीची विकासकामे झाली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र भाजपला पोषक वातावरण असून, आष्टा शहरात भाजप मित्रपक्षांच्या साथीने पालिकेवर झेंडा फडकवेल, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी केले. ते आष्टा येथे तालुका अध्यक्ष अमोल पडळकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष स्वरूपराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, आ. सदाभाऊ खोत, आ. सुरेश खाडे, आ.सत्यजित देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद बसुगडे, भाजप तालुका अध्यक्ष अमोल पडळकर, शहर अध्यक्ष नरेंद्र घाडगे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अभिजित बिरनाळे, संग्राम शिंदे, शहाजान जमादार, श्रीराम ढोले, अनुप वाडेकर, इम्रान मुजावर, सतीश कुलकर्णी, अविनाश औताडे, शिवसेना शिंदे गटाचे तालुका उपप्रमुख दिलीप कुरणे, शिवसेनेचे वाळवा तालुका संघटक वीर कुदळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख पोपट भानुसे, काँग्रेसचे राहुल थोटे, आरपीआयचे प्रदीप आवळे, दलित महासंघाचे लोकेश दिवटे, रयत क्रांती संघटनेचे सुदर्शन वाडकर, मनसेचे राजकुमार सावळवाडे उपस्थित होते.
आ.सुरेश खाडे म्हणाले, मी पालकमंत्री असताना आष्टा शहराला विविध विकासकामासाठी भरघोस निधी दिला असून, तो भाजपच्या माध्यमातून आला असताना काहीजण या निधीचे श्रेय लाटू पाहत आहेत. पक्ष शहरातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचला असून, जनता आमच्या पाठिशी नक्कीच राहिल. आमचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











