ashta news : वैभव-विशाल यांच्या नेतृत्वाखाली आष्ट्यात स्पर्धा परीक्षांचे नवे पर्व : आष्टा नगरीतील ज्ञानदीप उजळवणार्या स्वप्नांचा प्रवास 26 जानेवारी 2020 रोजी एका पवित्र संकल्पाने सुरू झाला. युवक नेते वैभव दादा शिंदे आणि प्राचार्य विशाल दादा शिंदे यांच्या सहकायाने जन्म घेतलेले राजाराम शिक्षण संस्था संचलित युवा कृती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र आज आष्ट्याच्या अभिमानाचा शिरोमणी बनले आहे.
ashta news : वैभव-विशाल यांच्या नेतृत्वाखाली आष्ट्यात स्पर्धा परीक्षांचे नवे पर्व
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्याच पावन दिवशी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा ताबा घेऊन या केंद्राने आपल्या वाटचालीची नव्या सूर्योदयाने सुरुवात केली.
चेअरमन वैभव दादा शिंदे यांच्या निर्णायक नेतृत्वाची कणखर साथ आणि प्राचार्य तसेच आष्टा नगरपालिका चे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल दादा शिंदे यांची शैक्षणिक दूरदृष्टी या केंद्राची खरी ताकद ठरली आहे. अभ्यास केंद्राची प्रत्येक वीट, प्रत्येक वर्ग, आणि प्रत्येक ध्येय ठरविणारी बैठक त्यांच्या अथक परिश्रमांची साक्ष देतात.
भारतीय महसूल सेवेतील अधिकारी शकील संदी यांच्या कल्पनेतून व विशालभाउ शिंदे व वैभवदादा शिंदे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात आला. हा आष्ट्यासाठी केवळ अभिमान नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत एकूण 35 विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत पास होऊन आष्टा शहराचे नाव उज्वल करत आहेत.
आता पोलीस भरतीसाठी नवीन बॅच सुरू होणार असल्याने आष्टा खर्या अर्थाने
सर्व स्पर्धा परीक्षांचे हब बनण्याच्या मार्गावर ठामपणे उभा आहे.
केंद्राची ही वाटचाल फक्त काही व्यक्तींच्या इच्छाशक्तीने घडलेली नव्हे.
वरदराज शिंदे आणि विश्वराज शिंदे यांची सततची काळजी, मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा या प्रवासाला मजबुती देतात.
तर दुसरीकडे,
राजू संदे,
उमेश कोडळकर,
तानाजी माळी,
अमीर फकीर,
संतोष बसुगडे,
बाळासाहेब होनमाने,
अमित बसुगडे,
पवन कांबळे
या संचालक मंडळाच्या समर्पणामुळे केंद्राची प्रगती अक्षरशः दिवसेंदिवस फुलत आहे. त्यांच्या एकजुटीने उभा राहिलेला हा प्रयत्न आज अनेक घरांची आशा, अनेक तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारा मार्ग, आणि आष्ट्याच्या उज्ज्वल भविष्याचा नवा अध्याय ठरत आहे.
यावेळी प्राचार्य आणि आष्टा नगरपालिका थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल दादा शिंदे यांनीही एक महत्त्वाची ग्वाही दिली-
येणार्या काळात केवळ आष्टा नव्हे, तर आष्टा आणि संपूर्ण जिल्ह्यातील सर्वात मोठे स्पर्धा परीक्षा केंद्र अष्ट्यात उभे राहील. आणि त्या स्वप्नाला पुर्ण करण्यासाठी राजाराम शिक्षण संस्था आणि वैभव दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व सुविधा, सर्व मदत आणि सर्व पाठींबा आम्ही देऊ, अशी खात्री त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
त्यांच्या या वक्तव्याने आष्ट्याच्या युवाशक्तीत जणू नवा जोश फुलला आहे.
हे केंद्र ही फक्त अभ्यासाची जागा नाही-
हे आहे स्वप्नांचे विद्यालय, आशांचे मंदिर, आणि भविष्याचा भक्कम पाया.
युवा कृती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र-
आष्ट्याच्या हृदयात पेटलेला हा ज्ञानदीप येणार्या पिढ्यांना उजळवत राहो यात शंका नाही.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











