samdoli news : सावळवाडी-दुधगाव मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक : दोघेजण गंभीर : दोनही वाहनांचे लाखोंचे नुकसान. : मिरज तालुक्यातील दुधगाव ते सावळवाडी जाणार्या मार्गावर दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोनही वाहनातील दोघेजण गंभीर जखमी झाले तर कारचे सुमारास एक लाखांचे नुकसान झाले. सदरचा अपघात हा मंगळवार दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी आदिनाथ बापुसो बरगाले (वय 36 रा. नांदणी) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक विकास विलास कलगुटगी (रा. जयसिंगपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
samdoli news : सावळवाडी-दुधगाव मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक : दोघेजण गंभीर : दोनही वाहनांचे लाखोंचे नुकसान.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी आदिनाथ बरगाले हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावामध्ये राहतात. बरगाले हे त्यांचे मित्र महावीर टारे यांच्या सोबत मंगळवारी दुपारी त्यांची कार रेनॉल्ट डस्टर (क्र. एमएच 09 सीएम 8334) मधून सावळवाडी ते दुधगाव जाणार्या मार्गावरून निघाले होते.
यावेळी समोरून येणार्या संशयित कार चालक विकास कलगुटगी यांनी त्यांच्या ताब्यातील कार (क्र. एमएच 09 एफक्यू 6083) हि भरधाव वेगात चालवून ओव्हरटेक करत असताना समोरून येणार्या बरगाले यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात बरगाले यांचे मित्र महावीर टारे हे गंभीर जखमी झाले तसेच कलगुटगी यांच्या कार मधील एकजण गंभीर जखमी झाला.
जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात दोनही वाहनांचे एक लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी बरगाले यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक विकास कलगुटगी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











