kavtepiran news : कवठेपिरान -लक्ष्मीफाटा रस्त्यावर अडीच लाखाची अवैध देशी दारू जप्त : कवठेपिरान ते लक्ष्मी फाट्याच्या रोडवर बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करणार्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी 40 हजारांची देशी दारू आणि एक कार असा एकूण 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली. पुंडलिक पराप्पा करेन्नवर (वय 46 रा. सावंत प्लॉट, सांगली) असे कारवाई केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
kavtepiran news : कवठेपिरान -लक्ष्मीफाटा रस्त्यावर अडीच लाखाची अवैध देशी दारू जप्त
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध दारू विक्री, वाहतूक करणार्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते.
यावेळी पथकातील कर्मचार्यांना माहिती मिळाली कि, पुंडलिक करेन्नवर हा ओमनी कार मधून बेकायदेशीर विना परवाना देशी दारू विक्रीसाठी घेऊन जाणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकाने कवठेपिरान ते लक्ष्मी फाट्याकडे जाणार्या मार्गावर सापळा लावला. माहिती प्रमाणे एक ओमनी कार येताना दिसली.
यावेळी कार थांबवून तपासणी केली असता त्यात देशी दारूचे बॉक्स मिळाले. यावेळी संशयित करेन्नवर यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा माल विनापरवाना ज्यादा दराने विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. यावेळी त्याला ताब्यात घेऊन देशी दारूसह 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी सांगली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी अनिल कोळेकर, सागर लवटे, नागेश खरात, सतीश माने, दरिबा बंडगर, अमर नरळे, महादेव नागने, विक्रम खोत यांच्या पथकाने केली
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











