tasgaon murdar news :सांबरवाडी-धुळगाव रस्त्यावर तरूणाचा निर्घुण खून

SHARE:

 tasgaon murdar news :सांबरवाडी-धुळगाव रस्त्यावर तरूणाचा निर्घुण खून : तासगाव तालुक्यातील धुळगाव येथील राजू गौतम खांडे (वय 40) यांची अज्ञातांनी पुलावर घेराव घालून वर्मी घाव देत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सांबरवाडी-धुळगाव रस्त्यावर असलेल्या पुलावर हा खून झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

tasgaon murdar news :सांबरवाडी-धुळगाव रस्त्यावर तरूणाचा निर्घुण खून

कारण अस्पष्ट : तासगाव पोलिसांचा कसून तपास

राजू खांडे यांचे गावातील मुख्य चौकात किराणा दुकान आहे. दुकान चालवण्याबरोबरच दुपारनंतर ते वडीलांसोबत गवंडी काम करत असत. बुधवारी त्यांनी दुकान बंद करून किराणा साहित्य खरेदीसाठी बाहेरगावी गेल्यानंतर, सांबरवाडीमार्गे धुळगावकडे परतताना पुलावर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. वर्मी घाव घालत त्यांचा जागीच खून करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपाधीक्षक अशोक भवड यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी कोण आणि हल्ल्यामागील हेतू काय, याचा उलगडा करण्यासाठी तासगाव पोलिसांकडून कसून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *